Liver Health : यकृत डिटॉक्स करण्यासाठी घरगुती उपाय, हळद - ज्येष्ठमध करतील यकृताचं संरक्षण
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
तब्येतीसाठी उपयुक्त नसलेले अनेक पदार्थ पोटात जातात आणि याचा संपूर्ण आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. विशेषतः जंक फूडमुळे आपल्या यकृतावर सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे यकृत डिटॉक्स करण्याचा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे हळद आणि ज्येष्ठमध.
मुंबई - आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे यकृत. विषारी पदार्थ काढून टाकण्याबरोबरच पचन, संप्रेरक संतुलन आणि त्वचेचं आरोग्य देखील यकृत नियंत्रित करतं. त्यामुळे यकृताची योग्य काळजी घेणं खूप महत्वाचं आहे.
तब्येतीसाठी उपयुक्त नसलेले अनेक पदार्थ पोटात जातात आणि याचा संपूर्ण आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. विशेषतः जंक फूडमुळे आपल्या यकृतावर सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे यकृत डिटॉक्स करण्याचा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे हळद आणि ज्येष्ठमध.
advertisement
आहारतज्ज्ञ श्वेता शाह यांनी सांगितलेला उपाय करण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. पहिली हळद आणि दुसरी ज्येष्ठमध. आयुर्वेदात हळदीला सुवर्ण यकृत संरक्षक म्हटलं जातं. त्यात असलेले कर्क्यूमिन हे घटक यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.
हळदीच्या नियमित सेवनानं यकृताची सूज कमी होते, पचन सुधारतं, पित्त रसाचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे चरबीचं पचन सहज होतं.
advertisement
ज्येष्ठमधानं पित्त शमन होण्यास मदत होते आणि यकृताच्या खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती शक्य होते. ज्येष्ठमधानं हार्मोन्स संतुलित होण्यास देखील मदत होते.
हळद आणि ज्येष्ठमध एकत्रितपणे यकृत स्वच्छ आणि दुरुस्त करतात. हळदीनं विषारी पदार्थ काढायला मदत होते, तर ज्येष्ठमधानं यकृतातली उष्णता कमी होते आणि अंतर्गत दुरुस्ती होते. यासाठी, पाव चमचा ज्येष्ठमध पावडर, अर्धा चमचा हळदीत मिसळा. हे मिश्रण एक ग्लास कोमट पाण्यात घाला आणि चांगलं ढवळा.
advertisement
दररोज सकाळी नाश्त्यापूर्वी रिकाम्या पोटी ते प्या.
हा सोपा घरगुती उपाय यकृताला दररोज विषमुक्त करण्यास मदत करू शकतो. हळद आणि ज्येष्ठमध दोन्हीही आयुर्वेदात वर्षानुवर्षे वापरली जातायत. यामुळे यकृत निरोगी राहिलच शिवाय पचन, हार्मोन्स आणि त्वचेचं आरोग्य देखील सुधारेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2025 6:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Liver Health : यकृत डिटॉक्स करण्यासाठी घरगुती उपाय, हळद - ज्येष्ठमध करतील यकृताचं संरक्षण