Hair Care : केस गळण्यावर हे उपाय वापरुन बघा, केस होतील मजबूत, दाट
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
नारळ तेल, लिंबू, अंड, ऑलिव्ह ऑईल, आवळा, शिकेकाई यांच्या संमिश्र वापरानं केसांची वाढ चांगली होईल आणि केस मजबूत, दाट होण्यासाठी मदत होईल. या नैसर्गिक उपायांचा उपयोग नक्की करुन बघा.
मुंबई : केस कोरडे होणं, केस गळणं, केस तुटणं या समस्या तुम्हालाही जाणवत असतील तर काही घरगुती, सोपे उपाय तुमच्यासाठी उपयोगी आहेत. आजकाल बहुतेक जण केस गळण्याच्या समस्येनं त्रासलेले आहेत. त्यामुळे केसांची वाढ हा अनेकांना भेडसावणारा प्रश्न आहे.
नारळ तेल, लिंबू, अंड, ऑलिव्ह ऑईल, आवळा, शिकेकाई यांच्या संमिश्र वापरानं केसांची वाढ चांगली होईल आणि केस मजबूत, दाट होण्यासाठी मदत होईल. या नैसर्गिक उपायांचा उपयोग नक्की करुन बघा.
नारळ तेल आणि लिंबू: नारळ तेल आणि लिंबाचा रस केसांना मजबूत आणि लांब करण्यास मदत करतो. दोन्ही मिसळा आणि केसांना लावा आणि हलक्या हातानं मसाज करा. एक तास तसंच राहू द्या आणि नंतर शॅम्पू लावा.
advertisement
आवळा आणि शिकेकाई: आवळा आणि शिकेकाईची पेस्ट बनवा आणि केसांना लावा. हे मिश्रण केसांना पोषण तर देतेच पण त्यांना मजबूत देखील करते.
अंडी आणि ऑलिव्ह तेल: अंड्यातील प्रथिनं आणि ऑलिव्ह तेल केसांना मजबूत आणि चमकदार बनवतात. दोन्ही मिसळा आणि केसांना लावा आणि 30 मिनिटं तसंच राहू द्या.
advertisement
भृंगराज तेल:
भृंगराज तेलानं केसांच्या वाढीला मदत होते. केसांवर हे तेल नियमितपणे लावल्यानं आणि मसाज केल्यानं केस जाड, काळे, मजबूत आणि चमकदार होतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 08, 2025 5:37 PM IST