advertisement

मनोरंजन क्षेत्रात हळहळ! प्राजक्ता माळीच्या सिनेमाचा सिनेमॅटोग्राफर, वयाच्या 31 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Last Updated:

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अलिकडेच आलेल्या सिनेमासाठी त्याने काम केलं होतं. या सिनेमाची आणि सिनेमॅटोग्राफीची खूप चर्चा झाली होती. 

News18
News18
मनोरंजन क्षेत्रातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर तन्मय राजेंद्र वनमाळी याचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी अकस्मिक निधन झालं. तन्मयच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.  सिने क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अतिशय कमी वयातच त्याने आपल्या कामाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली होती. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अलिकडेच आलेल्या फुलवंती सिनेमासाठी तन्मयनं काम केलं होतं. या सिनेमाची आणि सिनेमॅटोग्राफीची खूप चर्चा झाली होती.
तन्मय वनमाळी याने प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत सिनेमॅटोग्राफी क्षेत्रात आपली वाटचाल सुरू केली होती. कॅमेऱ्यामागील त्यांच्या नजरेत वेगळेपण आणि सर्जनशीलता होती. त्यामुळे अल्पावधीतच ते अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या पसंतीस उतरले होते.
advertisement
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी सहाय्यक तसेच सिनेमॅटोग्राफर म्हणून अनेक प्रोजेक्टमध्ये काम केले. 'सरसेनापती हंबीरराव' आणि 'फुलवंती' या सिनेमांमध्ये त्याने केलेलं काम विशेष चर्चेत आलं होतं. 'फुलवंती' सिनेमात अभिनेत्री प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत होते. तर सरसेनापती हंबीरराव या सिनेमात अभिनेते प्रविण तरडे, गश्मीर महाजनी, स्नेहल तरडे ही मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत होती.
advertisement
याशिवाय लवकरच रिलीज होणाऱ्या 'रामायण' या सिनेमासाठीही तन्मयनं काम केलं होतं. तन्मय वनमाळीच्या अचानक निधनाची बातमी समोर आल्यानंतर सिने क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक होतकरू, प्रतिभावान आणि मेहनती सिनेमॅटोग्राफर गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
या दुःखद घटनेनंतर वसईचे नेते हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरही अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि चाहत्यांनी तन्मय वनमाळी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तन्मय वनमाळी यांच्या निधनाने मराठी सिने क्षेत्राने एक उभरते आणि प्रतिभावान छायाचित्रकार गमावले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्याच्या कामाच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेल्या आठवणी आणि त्याचं काम मात्र प्रेक्षकांच्या मनात कायम राहणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
मनोरंजन क्षेत्रात हळहळ! प्राजक्ता माळीच्या सिनेमाचा सिनेमॅटोग्राफर, वयाच्या 31 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement