Health Tips : सीताफळ आले बाजारात, फायदे ऐकाल तर लगेच घ्याल विकत! Video

Last Updated:

सध्या बाजारात सीताफळाची आवक सुरू झाली आहे. गोडसर चव आणि अनोख्या बियांनी सजलेले हे फळ अनेकांना आवडते.

+
News18

News18

अमरावती: सध्या बाजारात सीताफळाची आवक सुरू झाली आहे. गोडसर चव आणि अनोख्या बियांनी सजलेले हे फळ अनेकांना आवडते. तसेच सीताफळ फक्त चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. सीताफळामध्ये कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे आणि व्हिटॅमिन ए, सी, बी6 हे मुबलक प्रमाणात असतात. तसेच यात फायबरदेखील असते, जे पचनासाठी चांगले आहे. सीताफळ खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत? याबाबत माहिती आहारतज्ज्ञ सोनाली अढाऊ यांनी दिली आहे.
सीताफळ खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत?
सीताफळ हे पचनासाठी उपयुक्त आहे. सीताफळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच सीताफळ रक्तदाब नियंत्रित ठेवते. या फळामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील रक्तदाब संतुलित ठेवतात तसेच हृदयविकाराचा धोका कमी करतात. सीताफळ रोगप्रतिकारशक्ती वाढवते. सीताफळामध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असते. हे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्दी-खोकला यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव करते.
advertisement
तसेच हाडे आणि स्नायू सुद्धा सीताफळाचे सेवन केल्यास मजबूत होतात. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात. त्यामुळे हाडे आणि स्नायू बळकट होतात. लहान मुलांसाठी व वृद्धांसाठी हे फळ विशेषतः उपयुक्त आहे, असे त्यांनी सांगितले.
सीताफळ त्वचेसाठी देखील फायदेशीर
पुढे त्या सांगतात की, तसेच सीताफळ त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. सीताफळातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यात मदत करतात. त्वचा उजळ आणि निरोगी राहण्यासाठी याचे सेवन उपयुक्त ठरते. सीताफळ ऊर्जा वाढवते. या फळाची चव गोडसर असल्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा देते. यात नैसर्गिक साखर असते जी शरीरासाठी उपयुक्त आहे. सीताफळ हे हंगामी फळ असून त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. मात्र कोणतेही फळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे रोज एक ते दोन सीताफळ पुरेसे आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : सीताफळ आले बाजारात, फायदे ऐकाल तर लगेच घ्याल विकत! Video
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement