advertisement

उन्हाळ्यात काकडी खाण्याचे चमत्कारीक फायदे, 99 टक्के लोकांना माहितच नाही!

Last Updated:

उन्हाळ्याच्या दिवसात काकडीचा वापर आपल्या आहारात आवश्यक करावा. काकडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. 

+
काकडी

काकडी

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाज्या, फळभाज्या खाणं आणि त्यांच आपल्या आहारात वापर करणे अत्यंत गरजेचं असतं. त्यातल्या त्यात काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात काकडीचा वापर आपल्या आहारात आवश्यक करावा. काकडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. काकडी खाल्ल्याने त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पचनाचे विकार देखील दूर होतात. काकडी खाण्याचे आरोग्यदायी कोणकोणते फायदे आहेत? याबद्दलचं आहार सल्लागार डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे. 
advertisement
काकडी खाण्याचे आरोग्यदायी कोणकोणते फायदे?
उष्णता वाढली की काकडी बरोबरच गाजर, बीट इत्यादी फळभाज्या खाण्याकडे लोकांचा कल वाढतो. उन्हाळ्यात अनेकजण वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी काकडीचे सेवन फायदेशीर ठरते. काकडीत फायबर असते. ज्यामुळे वजन कमी होते. काकडी मध्ये तब्बल 95 टक्के पाणी असते. यामुळे डिहायड्रेशन रोखण्यास मदत होते. शरीरात पाण्याची पातळी कमी होणे म्हणजे डिहायड्रेशन किंवा निर्जलीकरण होय. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते, तेव्हा डिहायड्रेशन होते. उन्हाळ्यात शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे दैनंदिन आहारात काकडीचे सेवन केल्यास डिहायड्रेशन रोखण्यास मदत होते, असं डॉक्टर अमृता कुलकर्णी सांगतात. 
advertisement
कोशिंबिरीमध्ये देखील काकडीचा वापर केला जातो. उन्हाळ्यात नागरिक कोशिंबीर खाण्यावर भर देतात. त्यात काकडीचा अधिक वापर केला जातो. काकडीचा रोजच्या आहारात वापर केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकही काकडीला पसंती देतात. काकडी कमी कॅलरीज आणि उच्च फायबर असलेले अन्न आहे. काकडी शरिराला हायड्रेटेड ठेवते. यामुळे फायबर बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होऊन पचनसंस्था सुधारते, असंही डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी सांगितलं. 
advertisement
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
उन्हाळ्यात काकडी खाण्याचे चमत्कारीक फायदे, 99 टक्के लोकांना माहितच नाही!
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement