Fruits Benefits : शरिरासाठी फळं नेहमी चांगली, पण या चुकीच्या वेळेत तर खात नाही ना?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
फळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत असे फायदेशीर असतं. प्रत्येकाने फळं ही आपल्या आहारात समाविष्ट केली पाहिजे.
छत्रपती संभाजीनगर : फळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत असे फायदेशीर असतं. प्रत्येकाने फळं ही आपल्या आहारात समाविष्ट केली पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का आपण कुठल्या वेळेमध्ये फळं खायला हवीत किंवा फळं खाण्याचे किती प्रमाण असलं पाहिजे? तर याविषयीचं आपल्याला आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी माहिती दिली आहे.
सध्या फळं खाणं एक प्रकारचं ट्रेंड आहे. फळं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत अशी लाभदायक असतात. पण फळं खाण्याचे देखील प्रमाण असतं, वेळ असते आणि फळं कशी खावी हे देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. सर्वप्रथम तर आपण फळं ही जी आपल्या भागामध्ये मिळतात ती सर्व फळं खाणे गरजेचे आहे. ते आपल्याला व्यवस्थित रित्या सूट होतील. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की ज्या सीझनमध्ये जे काही फळं असतं ते आपण आवर्जून खाल्लंच पाहिजे, असं आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी सांगितलं.
advertisement
फळं खाण्याची योग्य वेळ ही आहे ती म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही फळं खाऊ शकता. तसेच तुम्ही वर्कआउट केल्यानंतर देखील फळं खाऊ शकतात किंवा तुमची जी ब्रेकफास्ट करण्याची वेळ असेल त्या वेळेमध्ये देखील तुम्ही फळं खाऊ शकता.
advertisement
तुम्ही दुपारी चारच्या वेळेमध्ये देखील फळं खाऊ शकता. ही वेळ फळं खाण्यासाठी अगदी योग्य आहे. तसेच फळ खाताना नेहमी ताजी आणि ऑरगॅनिक फळं खावेत. ज्यांना शुगर आहे अशा रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच फळं खावेत. शुगर असलेल्या रुग्णांनी आंबा, केळी, सिताफळ, चिकू, टरबूज ही फळं खाणं शक्यतो तर टाळावीत. तुम्ही दुसरी फळं खाऊ शकता पण तुमच्या आहार तज्ज्ञ विचारूनच तुम्ही ही फळं खावीत. प्रत्येकाने फळं खाताना ती प्रमाणातच खावेत. एका व्यक्तीने दिवसभरामध्ये फक्त 100 ग्राम एवढीच फळं खावेत. याच्या वरती फळं खाऊ नये, असं आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी सांगितलं.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
May 19, 2025 6:01 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Fruits Benefits : शरिरासाठी फळं नेहमी चांगली, पण या चुकीच्या वेळेत तर खात नाही ना?