Health Tips : उपाशीपोटी खाताय हे पदार्थ? सकाळची चूक दिवसभरासाठी ठरेल भारी, आताच सोडा सवय, Video

Last Updated:

सकाळची सुरुवात अनेकजण चहा, कॉफी किंवा फळांपासून करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, काही पदार्थ उपाशीपोटी घेतल्यास पचनसंस्था, आम्लपित्त आणि एकूण आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

+
Health

Health Tips 

अमरावती : सकाळची सुरुवात अनेकजण चहा, कॉफी किंवा फळांपासून करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, काही पदार्थ उपाशीपोटी घेतल्यास पचनसंस्था, आम्लपित्त आणि एकूण आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण दिवस बेकार होतो. त्यामुळे आधीच काळजी घेणे गरजेचे आहे.  उपाशीपोटी कोणते पदार्थ घेऊ नयेत आणि त्यामागची कारणे काय आहेत? त्यासाठी जाणून घेऊया.
1. अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफीने करतात. पण ते योग्य नाही. उपाशीपोटी चहा किंवा कॉफी घेतल्यास पोटात आम्लनिर्मिती वाढते. त्यामुळे गॅस, आम्लपित्त, छातीत जळजळ आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
2. अनेकजण वजन कमी करण्यासाठी सकाळच्या वेळी लिंबू पाणी घेतात. लिंबातील आम्ल उपाशीपोटी पोटाच्या आतील आवरणाला त्रास देऊ शकते. गॅस्ट्रिक अल्सर किंवा आम्लपित्त असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
3. तसेच केळी देखील सकाळच्या वेळी खाणे हानिकारक ठरू शकते. केळ्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. उपाशीपोटी केळी खाल्ल्यास रक्तातील मॅग्नेशियमचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे थकवा किंवा हृदयाशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात.
4. त्याचबरोबर दही देखील उपाशीपोटी खाऊ नये. दही उपाशीपोटी घेतल्यास त्यातील लॅक्टिक ॲसिड पचनास अडथळा आणू शकते. त्यामुळे अपचन आणि गॅसची समस्या वाढू शकते.
advertisement
5. तसेच गोड पदार्थ उपाशीपोटी साखर किंवा गोड पदार्थ घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे थकवा, चक्कर येणे किंवा मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
6. कच्चा भाजीपाला काकडी, टोमॅटो, मिरची यांसारखा कच्चा भाजीपाला उपाशीपोटी घेतल्यास काही लोकांना पोटदुखी किंवा आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. तसेच उपाशीपोटी तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यास पोटाच्या आवरणावर परिणाम होतो. त्यामुळे अल्सर, जळजळ आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.
advertisement
आहार तज्ज्ञ सांगतात की, उपाशीपोटी सौम्य, हलका आणि पचनास सोपा आहार घ्यावा. कोमट पाणी, भिजवलेले बदाम, ओट्स किंवा साधी पोळी-भाजी हे उत्तम पर्याय ठरू शकतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : उपाशीपोटी खाताय हे पदार्थ? सकाळची चूक दिवसभरासाठी ठरेल भारी, आताच सोडा सवय, Video
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement