Heart Attack : पाठीत दुखतंय, येऊ शकतो हार्ट अटॅक, पाठ आणि हृदयाचा संबंध काय? डॉक्टरांनीच सांगितलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Heart Attack Symptoms : पाठ आणि हृदयाचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. डॉक्टरांनीच पाठदुखी हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण कसं काय असू शकतं, ते सांगितलं आहे.
नवी दिल्ली : हार्ट अटॅक म्हटलं की सगळ्यात आधी समोर येतं ते म्हणजे छातीतील वेदना. सामान्यपणे छातीत डाव्या बाजूला जिथं हृदय असतं तिथं होणाऱ्या वेदना म्हणजे हार्ट अटॅक असंच सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? हार्ट अटॅकच्या वेदना म्हणजे फक्त छातीतील वेदनाच नाही तर पाठीतील वेदनाही हार्ट अटॅकचं लक्षण आहे.
पाठीतील वेदना हार्ट अटॅकचं लक्षण. हे कसं काय? पाठ आणि हृदयाचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. डॉक्टरांनीच पाठदुखी हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण कसं काय असू शकतं, ते सांगितलं आहे. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिमित्री यारानोव्ह यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
डॉ. यारानोव्ह यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये एका महिला रुग्णाचा अनुभव शेअर केला. महिलेने सांगितलं की प्रत्यक्ष हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी सुमारे दोन आठवडे तिला अनेक लक्षणं जाणवत होती. सुरुवातीला तिला थकवा, पोटदुखी, उजव्या खांद्यावर आणि पाठीत वेदना जाणवत होत्या. तिला डोकेदुखी देखील होऊ लागली. पण तिने हे सर्व सामान्यं लक्षणं मानलीय. प्रत्यक्ष हृदयविकाराचा दिवस आला तेव्हा तिला जबड्यात तीव्र वेदना आणि डाव्या हातात मुंग्या येणं जाणवू लागलं. तेव्हाच तिला प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं. या उदाहरणावरून असं दिसून येतं की वारंवार दिसणारी लहान लक्षणंदेखील हलक्यात घेणं धोकादायक ठरू शकतं.
advertisement
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिमित्री यारानोव्ह यांनी सोशल मीडियावर सांगितलं आहे की महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका सामान्य लक्षणांपेक्षा वेगळ्या स्वरूपात दिसून येतो. महिलांमध्ये हृदयविकाराचं पहिलं आणि सामान्य लक्षण म्हणजे खूप थकवा असू शकतो. हा थकवा सामान्यपेक्षा वेगळा असतो. उदाहरणार्थ, कोणतंही जड काम न करताही एखाद्या व्यक्तीला अचानक खूप थकवा जाणवतो. याशिवाय धाप लागणं, हलकी चक्कर येणं, मळमळ होणं किंवा पोटदुखी हे देखील हृदयविकाराचं लक्षण असू शकते. अनेक महिला पाठ, जबडा, खांदा किंवा मान दुखण्याची तक्रार करतात, ज्याला लोक अनेकदा स्नायू किंवा तणावाची समस्या मानतात. यामुळेच वेळेवर उपचार केले जात नाहीत आणि धोका वाढतो.
advertisement
महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं वेगवेगळी आणि सूक्ष्म असू शकतात, जी सामान्य समस्या समजून दुर्लक्षित केली जातात. परंतु या छोट्या इशाऱ्या जीव वाचवणाऱ्या ठरू शकतात. जर शरीर काही असामान्य संकेत देत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
Location :
Delhi
First Published :
August 22, 2025 3:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : पाठीत दुखतंय, येऊ शकतो हार्ट अटॅक, पाठ आणि हृदयाचा संबंध काय? डॉक्टरांनीच सांगितलं