बुलेट ट्रेन अन् हेलिकॉप्टर फटाके घेतले का? एकदा पाहाच हा VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
diwali 2024 - मागील 70 वर्षांपासून इथे दिवाळीत मोठे फटाका मार्केट भरते. 60 पेक्षा अधिक फटाक्यांची दुकाने इथे उपलब्ध आहेत. होलसेल दरामध्ये ग्राहकांना फटाके खरेदीची संधी या बाजारात उपलब्ध होते. जालन्यातील या प्रसिद्ध फटाका बाजारामध्ये यावर्षी कोणते नवीन फटाके विक्रीसाठी आलेले आहेत? याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना - सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. नवीन कपडे खरेदी करण्याची रेलचेल, घरामध्ये गृहिणींची फराळ तयार करण्याची लगबग तर बच्चे कंपनी देखील फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. जालना शहरातील आझाद मैदानावर दिवाळीत भरणारे फटाका मार्केट संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध आहे.
मागील 70 वर्षांपासून इथे दिवाळीत मोठे फटाका मार्केट भरते. 60 पेक्षा अधिक फटाक्यांची दुकाने इथे उपलब्ध आहेत. होलसेल दरामध्ये ग्राहकांना फटाके खरेदीची संधी या बाजारात उपलब्ध होते. जालन्यातील या प्रसिद्ध फटाका बाजारामध्ये यावर्षी कोणते नवीन फटाके विक्रीसाठी आलेले आहेत? याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
फटाके विक्रेते गणेश मुदिराज यांनी यावेळी याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, जालना शहरातील आझाद मैदानावर भरणारे फटाका मार्केट हे 70 ते 80 वर्ष जुने आहे. या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्यातून किरकोळ विक्रेते फटाका खरेदीसाठी येतात. नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने फटाका खरेदीसाठी सामान्य नागरिक आणि किरकोळ विक्रेते येतात.
advertisement
याठिकाणी रेग्युलर फटाक्यांबरोबरच यावर्षी नवीन फटाके देखील बाजारात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. यामध्ये हेलिकॅप्टर, पीकॉक, बुलेट ट्रेन, डबल बस, टू इन वन चक्कर प्लस अनार, टू इन वन आनार अशा प्रकारचे नवीन फटाके दाखल झाले आहेत.
या फॅन्सी फटाक्यांबरोबरच रेग्युलर वाजणारे फटाके बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मात्र, दिवाळी असतानाही फटाका मार्केट फारसे गजबजलेलं नसल्याचं आणि व्यवसाय देखील पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नसल्याचं विक्रेते गणेश मुदीराज यांनी सांगितले. मात्र, दिवाळी अजून आणखी बाकी आहे. त्यामुळे पुढील दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने व्यवसाय होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
advertisement
फटाक्यांच्या दरांबाबत बोलायचे झाल्यास मागील वर्षी प्रमाणेच दर आहेत. थोड्याफार प्रमाणात वाढ झाली असेल. मात्र, लक्षणीय म्हणावी अशी वाढ झाली नसल्याचे मुदीराज यांनी सांगितले. राज्य शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना आम्हाला किती फायदा पोहोचते हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार असल्याचे ते म्हणाले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
October 31, 2024 2:37 PM IST