विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी, या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
National Means Cum-Merit Scholarship Scheme - या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर विद्यार्थी अर्ज करू शकतात. त्यामुळे अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचा आव्हान करण्यात आले आहे.
प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई - नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप हा भारतातील केंद्र-प्रायोजित शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. या शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आर्थिक मदत प्रदान करणे आहे. ही शिष्यवृत्ती समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आहे.
उच्च शिक्षण सुरू ठेवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. नववी ते बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी गरीब गुणवंत विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून नॅशनल मीन्स कम मेरिट्स स्कॉलरशिप देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर विद्यार्थी अर्ज करू शकतात. त्यामुळे अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचा आव्हान करण्यात आले आहे.
advertisement
एनएमएसएस शिष्यवृत्ती योजना राज्य सरकार सरकारी अनुदानित व आणि संस्थेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. राज्य सरकारद्वारे घेतलेल्या पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नववीच्या 1 लाख विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
काय आहे पात्रता -
view commentsया शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी किमान 55 टक्के एकूण ग्रेडसह इयत्ता 8 मधून पदोन्नती मिळाल्यानंतर ते 9 वी मध्ये शिकत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने त्याचे शिक्षण सरकारी/स्थानिक संस्था/शासकीय अनुदानित शाळांमधून घेतले पाहिजे. उमेदवाराला त्यांच्या इयत्ता 10वीमध्ये 66 टक्के गुण मिळालेले असावेत. इयत्ता 11 ते इयत्ता 12 वीपर्यंत स्पष्ट प्रमोशन मिळाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी 55 टक्के किंवा समतुल्य गुण मिळवलेले असावेत. एससी/एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 5 टक्के सूट मिळेल. उमेदवाराचे कौटुंबिक उत्पन्न 1.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. NVS, KVS, सैनिक शाळा आणि खाजगी शाळांमध्ये नोंदणी केलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2024 2:05 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी, या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस


