HMPV Ayurvedic Remedies: घरीच करा 'हे' साधे उपाय, दूर पळेल HMPV व्हायरसच्या संक्रमणाचा धोका

Last Updated:

Ayurvedic Remedies to prevent HMPV: कोविड प्रमाणे HMPV हा सुद्धा श्वसनयंत्रणेवर आघात करतो. त्यामुळे श्वसनयंत्रणेला फायद्याचे ठरणारे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय केले तर HMPV संक्रमणाला दूर ठेवता येऊ शकतं. जाणून घेऊयात नव्या व्हायरसशी लढण्यासासाठी फायदेशीर ठरणारे आयुर्वेदिक उपाय.

प्रतिकात्मक फोटो : घरीच करा हे साधे उपाय, दूर पळेल HMPV चा धोका
प्रतिकात्मक फोटो : घरीच करा हे साधे उपाय, दूर पळेल HMPV चा धोका
मुंबई: सध्या चीनने आणि चीनमध्ये आढळून आलेल्या HMPV म्हणजेच ह्युमन मेटाप्न्यूमोव्हायरसने जगाची चिंता वाढवली आहे. चीननंतर हाँगकाँग, मलेशिया आणि भारतातही या व्हायरसचे रूग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. देशातल्या विविध राज्यांच्या आरोग्ययंत्रणा सतर्क झाल्यात. जगभगात HMPV व्हायरसचे वाढते रूग्ण पाहून अनेकांनी या नव्या व्हायरसची तुलना कोरोनाशी करायला सुरूवात केलीये. कारण HMPV च्या संसर्गातही खोकला, ताप, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यात अडचण अशी कोविडसारखी लक्षणं दिसून येत आहेत. मात्र हा नवा व्हायरस कोविड इतका धोकादायक नसल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोविड प्रमाणेच HMPV हा श्वसनयंत्रणेवर आघात करतो. त्यामुळे ज्यांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे किंवा ज्यांना दमा, अस्थमा किंवा अन्य श्वसनाचे विकार आहेत अशा व्यक्तींना आरोग्याची जास्त काळजी घेणं हिताचं ठरतं.
आपल्याला जर आठवत असेल तर कोविडशी लढण्यासाठी विविध आयुर्वेदिक काढ्यांचा वापर केला गेला होता. याशिवाय प्राणायमं आणि काही होमिओपॅथिक औषधंसुद्धा कोविडवर प्रभावी ठरली होती. आधी सांगितल्याप्रमाणे कोविड प्रमाणे HMPV हा सुद्धा श्वसनयंत्रणेवर आघात करतो. त्यामुळे श्वसनयंत्रणेला फायद्याचे ठरणारे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांनी HMPV संक्रमणाला दूर ठेवता येऊ शकतं.

नव्या व्हायरसशी लढण्यासासाठी घरगुती आयुर्वेदिक उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

advertisement

तुळशीचा चहा

Ayurvedic Remedies to prevent HMPV in Marathi: घरीच करा ‘हे’ साधे उपाय, दूर पळेल HMPV व्हायरसच्या संक्रमणाचा धोका
तुळशीला आयुर्वेदात आणि हिंदूधर्मशास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहे. इतकंच काय तर तुळशीला इंग्रजीमध्ये Holy Basil असं म्हटलं जातं. तुळशीत अँटिऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटीफंगल सारखे गुणधर्म आहेत, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवून साथीच्या रोगापासून रक्षण करायला मदत करतात. याशिवाय तुळशीत असलेल्या दाहक विरोधी गुणधर्म वेदनेपासून आराम देतात.  त्यामुळे सकाळी चहाच्या ऐवजी गरम पाण्यात तुळशीची पानं उकळवून केलेला तुळशीचा चहा किंवा काढा पिणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं.
advertisement

हळदीचं दूध

Ayurvedic Remedies to prevent HMPV in Marathi: घरीच करा ‘हे’ साधे उपाय, दूर पळेल HMPV व्हायरसच्या संक्रमणाचा धोका
हळदीची ओळख नैसर्गिक अँटिबायोटिक अशी आहे. याशिवाय हळदीमध्ये अँटीसेप्टिक, अँटीव्हायरल, अँटीफंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून सर्दी, खोकल्याच्या त्रासापासून आराम मिळतो. त्यामुळे विविध संक्रमणांचा धोका टळतो. जर तुम्हाला दूध पिणं आवडत नसेल तर तुम्ही गरम पाण्यात हळद टाकूनही ती पिऊ शकता.
advertisement

आलं आणि मधाचा चहा

Ayurvedic Remedies to prevent HMPV in Marathi: घरीच करा ‘हे’ साधे उपाय, दूर पळेल HMPV व्हायरसच्या संक्रमणाचा धोका
वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध टाकून पिणं फायद्याचं मानलं गेलंय. हे पाणी गरम करताना यात आल्याचा तुकडा टाकला तर आलं, मधाचा चहा पिणं आरोग्यासाठी फायद्याचा ठपू शकतो. आले आणि मधातले औषधी गुणधर्म सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या विकाराना दूर ठेऊ शकतात.
advertisement

कोमट मीठ-पाण्याच्या गुळण्या

Ayurvedic Remedies to prevent HMPV in Marathi: घरीच करा ‘हे’ साधे उपाय, दूर पळेल HMPV व्हायरसच्या संक्रमणाचा धोका
advertisement
कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. याशिवाय घसा दुखणं, घसा खवखवण्याच्या त्रासावर देखील गुळण्या करण्याचा सल्ला दिला जातो. एखाद्या व्यक्तीचा आवाज बसला असेल किंवा त्यांना इंफेक्शनमुळे अन्न गिळायला त्रास होत असेल तर मीठ पाण्याच्या गुळण्या केल्याने आराम मिळू शकतो.

गरम पाण्याची वाफ

Ayurvedic Remedies to prevent HMPV in Marathi: घरीच करा ‘हे’ साधे उपाय, दूर पळेल HMPV व्हायरसच्या संक्रमणाचा धोका
advertisement
सर्दी आणि खोकला किंवा श्वसनाच्या विकारांवर गरम पाण्याची वाफ घेण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देतात. यामुळे चोंदलेले नाक उघडायला मदत होते. श्वसनमार्गातला अडथळा दूर झाल्यामुळे श्वास घ्यायला मदत होते. गरम पाण्याची वाफ घेताना त्यात निलगिरीचे काही थेंब टाकल्यास जास्त फायद्याचं ठरतं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
HMPV Ayurvedic Remedies: घरीच करा 'हे' साधे उपाय, दूर पळेल HMPV व्हायरसच्या संक्रमणाचा धोका
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement