Home Remedies : पोटात जंत झाल्यावर काय करायचं? हे 6 घरगुती उपाय नक्कीच ठरतील रामबाण

Last Updated:

औषधांसोबतच काही घरगुती देसी उपायसुद्धा या समस्येत चांगले परिणाम देऊ शकतात. चला तर जाणून घेऊया असे 6 सोपे पण प्रभावी उपाय जे पोटातील जंतांना मुळापासून दूर करण्यास मदत करू शकतात.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : पोटात जंत होणे ही खूपच त्रासदायक समस्या आहे, विशेषत: लहान मुलांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. यामुळे पोटदुखी, भूक न लागणे, वजन कमी होणे आणि जुलाब असे त्रास जाणवतात. औषधांसोबतच काही घरगुती देसी उपायसुद्धा या समस्येत चांगले परिणाम देऊ शकतात. चला तर जाणून घेऊया असे 6 सोपे पण प्रभावी उपाय जे पोटातील जंतांना मुळापासून दूर करण्यास मदत करू शकतात.
लसूण
लसूणमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीपॅरासाइट गुणधर्म असतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 2 कच्च्या लसणीच्या पाकळ्या चावून खाल्ल्याने पोटातील जंतं नष्ट होण्यास मदत होते.
कच्चं पपई
कच्च्या पपईत असे एन्झाइम्स असतात जे जंतांना नष्ट करण्यात मदत करतात. एक चमचा कच्च्या पपईचा रस, एक चमचा मध आणि कोमट पाणी एकत्र करून प्यायल्याने फायदा होतो.
advertisement
कडुलिंबाची पानं
कडुलिंबामध्ये नैसर्गिक औषधी घटक असतात जे पोटातील जंतं दूर करण्यास मदत करतात. 5-6 कडुलिंबाची पानं बारीक करून त्यात मध मिसळून सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने फायदा होतो.
हळद
हळद हे नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे. दररोज सकाळी कोमट पाणी किंवा दुधासोबत एक चिमूटभर हळद घेतल्याने पोटातील जंतांचा त्रास कमी होतो. शक्य असल्यास कच्च्या हळदीचा रस अधिक परिणामकारक ठरतो.
advertisement
नारळ
नारळातील नैसर्गिक घटक शरीरातील जंतं बाहेर काढण्यात मदत करतात. सकाळच्या नाश्त्यात एक चमचा नारळाचं तेल किंवा किसलेला नारळ खाल्ल्याने फायदा होतो.
ओवा आणि गूळ
ओवा हा पोटाला साफ करण्यास मदत करतो तर गूळ शरीराला ऊर्जा देतो. दररोज सकाळी एक चमचा ओवा गुळासोबत खाल्ल्यास जंतांचा त्रास कमी होतो.
हे घरगुती उपाय सोपे असले तरी नियमितपणे आणि योग्य प्रमाणात केल्यासच परिणाम दिसून येतात. मात्र लक्षणं जास्त वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणंही आवश्यक आहे.
advertisement
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Home Remedies : पोटात जंत झाल्यावर काय करायचं? हे 6 घरगुती उपाय नक्कीच ठरतील रामबाण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement