Diet tips - केळी आहेत आरोग्यासाठी वरदान, आहारात करा समावेश, आजारांना ठेवा दूर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केळी म्हणजे इतर फळांच्या तुलनेत मिळणारं सहज, स्वस्त आणि लोकप्रिय फळ. या फळाचा समावेश आहारात करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. कारण केळ्यांमध्ये आढळणारी सर्व पोषक तत्वं तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
मुंबई : केळी म्हणजे इतर फळांच्या तुलनेत मिळणारं सहज, स्वस्त आणि लोकप्रिय फळ. या फळाचा समावेश आहारात करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. कारण केळ्यांमध्ये आढळणारी सर्व पोषक तत्वं तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. पाहूयात रोज केळी खाण्याचे फायदे...
आरोग्य तज्ज्ञ अनेकदा केळी खाण्याचा सल्ला देतात. कारण केळ्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्वं आढळतात. जीवनसत्वं, खनिजं, तंतूमयता युक्त केळी खाल्ल्यामुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडण्यापासून वाचू शकता. म्हणूनच याला सुपरफूड म्हटलं जातं. केळ्याचं योग्य प्रमाणात सेवन केल्यानं आरोग्यात चांगल्या पद्धतीनं सुधारणा होऊ शकते. केळ्यांचा आहारात समावेश करण्याच्या योग्य पद्धती समजून घेऊया.
advertisement
Bones and Nerves - नसा आणि हाडांच्या मजबुतीसाठी हे नक्की करा, शरीर होईल तंदुरुस्त, आहारात करा हा बदल
वजन कमी करण्यात उपयुक्त
दररोज सकाळी रिकाम्या पोटी केळी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केळ्यांमुळे वजन कमी होण्यातही मदत होते. केळी कमी कॅलरी आणि कर्बोदकयुक्त असल्यानं दिवसभर उत्साह वाटेल.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
advertisement
हृदयाच्या आरोग्यासाठी केळी खूप फायदेशीर ठरू शकतात. योग्य प्रमाणात केळीचं नियमित सेवन केल्यानं
तुम्ही हृदयाशी संबंधित गंभीर आणि प्राणघातक आजारांचा धोका कमी करू शकता.
रक्तदाब नियंत्रण
रक्तदाब नियंत्रित करायचा असेल तर तुमच्या आहारात केळ्यांचा समावेश करा. याशिवाय मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी केळीचं सेवन केलं जाऊ शकतं.
advertisement
आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
फायबर युक्त केळीचे सेवन केल्यानं, आतड्यांचं आरोग्यही सुधारु शकतं. जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा अतिसाराचा त्रास होत असेल तर केळी खाण्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला आपोआप जाणवतील. एकंदरीत, केळीमध्ये आढळणारे सर्व घटक तुमच्या पचनसंस्थेचं आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. केळ्यांमध्ये असलेला पेक्टीन हा घटक आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अन्नाच्या पचनाबरोबरच त्यातील फायबर कोलेस्टरॉल कमी करण्यात मदत होते. केळ्यांमध्ये असलेल्या फायबरसह सुक्रोज, फ्रक्टोज, ग्लुकोज शरीराला आवश्यक ती ऊर्जा पुरवण्याचं काम करतात. यातल्या पोटॅशियममुळे स्नायूंच्या हालचालींना मदत होते आणि त्यामुळे पायात पेटके येऊन ज्या वेदना होतात त्या कमी होऊ शकतात. केळी तुमच्या आरोग्यासाठी तसंच त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2024 2:37 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diet tips - केळी आहेत आरोग्यासाठी वरदान, आहारात करा समावेश, आजारांना ठेवा दूर