Skin Aging : वृद्धत्वाची चिन्हं लवकर का दिसतात ? शरीरातले बदल कशाचे संकेत आहेत ?

Last Updated:

कोणती उत्पादनं वापरता यापेक्षा आपल्या काही दैनंदिन सवयींमुळेही त्वचा लवकर वयस्कर दिसते. या सवयी कोणत्या आणि यामुळे शरीरात काय बदल होतात, त्याचं प्रतिबिंब चेहऱ्यावर का दिसतं समजून घेऊया.

News18
News18
मुंबई : चेहरा म्हणजे तुमच्या प्रकृतीचा आरसा. मेकअपनं चेहऱ्यावरच्या खुणा लपवता आल्या तरी तुमचा आहार, व्यायाम कसा आहे. तुम्ही प्रकृतीची काळजी कशी घेता यावर तुमचं दिसणं अवलंबून असतं. वय काहीही असो, चेहरा चांगला, फ्रेश आणि तरुण दिसावा असं प्रत्येकाला वाटतं.
त्वचेसाठी महिला महागड्या सौंदर्यप्रसाधनांपासून ते घरगुती उपचारांपर्यंत सर्व काही वापरून पाहतात. पण हे सर्व असूनही, त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणं दिसून येतात. अकाली सुरकुत्या येणं, चेहरा कोरडा होणं आणि निस्तेज दिसणं या खुणांमुळे चेहऱ्याची चमक निघून जाते.
advertisement
कोणती उत्पादनं वापरता यापेक्षा आपल्या काही दैनंदिन सवयींमुळेही त्वचा लवकर वयस्कर दिसते. या सवयी कोणत्या आणि यामुळे शरीरात काय बदल होतात, त्याचं प्रतिबिंब चेहऱ्यावर का दिसतं समजून घेऊया.
सततचा ताण - सततचा ताण त्वचेसाठी खूप हानिकारक असतो. चिंता आणि अतिविचार केल्यानं शरीरात कॉर्टिसोल हार्मोनचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे सुरकुत्या पडतात आणि ओलावा कमी होतो. ताणामुळे तुमचा चेहरा थकलेला दिसतोच, शिवाय त्वचा लवकर कोरडी होते. म्हणून, आराम करण्यासाठी थोडा वेळ काढा. संगीत ऐका, ध्यान करा किंवा तुमच्या आवडत्या कामांनाही वेळ देण्याचा प्रयत्न करा.
advertisement
राग - छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येत असेल किंवा नेहमी चिडचीड होत असेल तर ही सवय तुमच्या त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकते. रागामुळे शरीरात कॉर्टिसोलसारखे ताण संप्रेरक वाढतात, ज्यामुळे सुरकुत्या, निस्तेजपणा आणि रंगद्रव्य यासारख्या त्वचेच्या समस्या उद्भवतात. यामुळे हळूहळू, तुमचा चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसू लागतो. म्हणून, जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा खोल श्वास घ्या, ध्यान करा आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा.
advertisement
अपुरी झोप - झोपेचा अभाव हा सौंदर्याचा सर्वात मोठा शत्रू असू शकतो. पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात, ज्यामुळे काळी वर्तुळं, सुजलेले डोळे, निस्तेजपणा आणि अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात. झोपेच्या वेळी त्वचा स्वतःची दुरुस्ती करते, पण ही संधी शरीरारला मिळत ​​नाही तेव्हा त्याचे परिणाम थेट तुमच्या चेहऱ्यावर दिसतात. म्हणून, दररोज सात ते आठ तास झोप घ्या आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा.
advertisement
व्यायाम न करणं - शारीरिक हालचाली प्रकृतीसाठी अत्यावश्यक आहेत. व्यायाम न केल्यानं त्वचेवर परिणाम जाणवतो. शारीरिक हालचालींच्या अभावामुळे चयापचय मंदावतो आणि शरीरातील रक्ताभिसरण देखील कमकुवत होतं. त्याचा परिणाम थेट तुमच्या त्वचेवर दिसून येतो. यामुळे त्वचा निस्तेज होते, चमक कमी होते आणि अकाली वृद्धत्वाची चिन्हं दिसतात. म्हणून, दररोज किमान 30 मिनिटं चालणे, योगाभ्यास करणं किंवा हलका व्यायाम करणं आवश्यक आहे.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Aging : वृद्धत्वाची चिन्हं लवकर का दिसतात ? शरीरातले बदल कशाचे संकेत आहेत ?
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement