Cholesterol : वाढलेल्या कॉलेस्ट्रॉलवर नैसर्गिक उपाय, हिरवी पानं कोलस्ट्रॉल, हृदयरोगासाठीही उपयुक्त

Last Updated:

वाढलेलं कोलेस्ट्रॉल हळूहळू हृदयरोगास कारणीभूत ठरतं, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. काही घरगुती उपायांमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होण्यास आणि आपलं हृदय मजबूत होण्यास मदत होते. विशेषतः कडिपत्ता, कोथिंबीर, मेथी, तुळस अशी हिरवी पानं कोलेस्ट्रॉल कमी करण्यास अत्यंत प्रभावी आहेत.

News18
News18
मुंबई : रक्तदाब वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं या अनेकांसाठी चिंतेचा विषय. धावपळ, चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे कोलेस्ट्रॉल नावाचा मेणासारखा पदार्थ रक्तवाहिन्यांच्या भिंतींना चिकटून राहू शकतो.
शिरा अरुंद होतात तेव्हा रक्तप्रवाह बिघडतो आणि हृदयापर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही, ज्यामुळे अनेकदा हृदयविकाराचा झटका आणि हृदय बंद पडणं यासारखी गुंतागुंत निर्माण होते.
advertisement
जंक फूड, ताणतणाव आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्यानं वाढते. वाढलेलं कोलेस्ट्रॉल हळूहळू हृदयरोगास कारणीभूत ठरतं, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
काही घरगुती उपायांमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होण्यास आणि आपलं हृदय मजबूत होण्यास मदत होते. विशेषतः काही हिरवी पानं कोलेस्ट्रॉल कमी करण्यास अत्यंत प्रभावी आहेत. या पानांमुळे हृदय निरोगी राहतंच शिवाय शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास देखील मदत करतात.
advertisement
मेथीची पानं - मेथीच्या पानांत फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करणं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) वाढण्यासाठी ही पानं उपयुक्त आहेत. मेथीचे पराठे, भाजी हृदयासाठी फायदेशीर आहे.
पालक - पालकात लोह, फायबर आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं. पालकात आढळणारं ल्युटीन हे संयुग धमन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करते. आहारात पालक सूप, पराठे किंवा भाजी खाणं कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचा सोपा मार्ग आहे.
advertisement
कोथिंबीरीच्या पानांंत दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे हृदयाची जळजळ कमी होते. यामुळे पचन सुधारतं आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात. चटणी किंवा सॅलडमधे कोथिंबीर वापरल्यानं हृदयाचं आरोग्य राखण्यास मदत होते.
advertisement
तुळशीच्या पानांत अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे ताण कमी होतो आणि हृदयाचे ठोके संतुलित राहतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पानं खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल नियंत्रित होण्यास मदत होते.
कडीपत्ता यकृताला विषमुक्त करतो आणि चयापचय सुधारतं. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास यामुळे मदत होते. भाज्या किंवा डाळीत कढीपत्ता घातल्यानं चव वाढते आणि आरोग्यासाठीही कडीपत्ता फायदेशीर आहे.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cholesterol : वाढलेल्या कॉलेस्ट्रॉलवर नैसर्गिक उपाय, हिरवी पानं कोलस्ट्रॉल, हृदयरोगासाठीही उपयुक्त
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement