Dry Eyes : डोळ्यांची नियमित काळजी महत्त्वाची, डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी खास टिप्स
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मोबाईल फोन किंवा लॅपटॉपसमोर असतो तेव्हा आपण कमी वेळा डोळे मिचकावतो. स्क्रीन वापरताना आपला डोळे मिचकावण्याचा दर अंदाजे 60% कमी होतो असं संशोधनातून समोर आलं आहे. याचा थेट परिणाम डोळ्यांमधील ओलाव्यावर होतो, ज्यामुळे ते कोरडे, लाल होतात आणि डोळ्यांना खाज सुटते. याकडे दुर्लक्ष करणं महागात जाऊ शकतं.
मुंबई : सध्या बहुतेकांच्या हातात खूप वेळ गॅझेट्स असतात. मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा टीव्ही स्क्रीनसमोर तासन्तास बसल्यानं डोळ्यांवर मोठा परिणाम होतो. सतत स्क्रीनकडे पाहिल्यानं डोळे कोरडे होऊ शकतात. ज्यामुळे डोळ्यांना खाज येऊ शकते.
असा बदल जर तुम्हालाही जाणवत असेल तर ही माहिती नक्की पूर्ण वाचा. प्रसिद्ध योगगुरू हंसा योगेंद्र यांनी यावर एक सोपी युक्ती सांगितली आहे. यामुळे डोळे कोरडे होणं आणि डोळ्यांना खाज सुटणं यावर आराम मिळू शकेल.
advertisement
योगगुरूंच्या मते, जेव्हा आपण मोबाईल फोन किंवा लॅपटॉपसमोर असतो तेव्हा आपण कमी वेळा डोळे मिचकावतो. स्क्रीन वापरताना आपला डोळे मिचकावण्याचा दर अंदाजे 60% कमी होतो असं संशोधनातून समोर आलं आहे. याचा थेट परिणाम डोळ्यांमधील ओलाव्यावर होतो, ज्यामुळे ते कोरडे, लाल होतात आणि डोळ्यांना खाज सुटते. याकडे दुर्लक्ष करणं महागात जाऊ शकतं.
advertisement
हे टाळण्यासाठी काही उपाय करता येतील. आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी आपण डोळे मिचकावण्याचे व्यायाम केले पाहिजेत. या व्यायामांनी डोळ्यांना नैसर्गिकरित्या आर्द्रता मिळते.
सॉफ्ट ब्लिंक - डोळे दोन सेकंदांसाठी बंद करा, नंतर हळूहळू उघडा. हे पाच वेळा करा.
स्क्विझ ब्लिंक - डोळे बंद करा आणि हलक्या दाबानं दोन सेकंद डोळे घट्ट बंद करा. नंतर ते हळूहळू उघडा. हे पाचवेळा करा.
advertisement
योगगुरूंच्या मते, हे दोन्ही व्यायाम डोळ्यांच्या पृष्ठभागावर एक संरक्षक तेलाचा थर तयार करतात. हा थर डोळ्यांना कोरडं होण्यापासून वाचवतो आणि ओलावा टिकवून ठेवतो.
आणखी काही टिप्सही उपयुक्त ठरू शकतात. दर वीस मिनिटांनी, स्क्रीनपासून दूर पहा आणि वीस सेकंदांसाठी दूर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे पहा.
advertisement
स्क्रीनचा ब्राइटनेस डोळ्यांना आरामदायी होईल अशा पातळीवर सेट करा.
शरीर आणि डोळे हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्या.
डोळे अजूनही जळजळत असतील किंवा जास्त कोरडे वाटत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2025 5:53 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dry Eyes : डोळ्यांची नियमित काळजी महत्त्वाची, डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी खास टिप्स