Uric Acid : त्वचेवरही दिसतात युरिक अॅसिड वाढल्याची लक्षणं, या हेल्थ टिप्सचा होईल फायदा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
युरिक अॅसिड क्रिस्टल्स केवळ सांध्यातच नाही तर त्वचेखाली देखील जमा होऊ शकतात, ज्यामुळे विविध लक्षणं दिसून येतात. इथे सांगितलेली पाच लक्षणं आढळली तर वेळीच सावध व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर आणि योग्य उपचार करता येतील.
मुंबई : शरीरात यूरिक अॅसिड वाढतं तेव्हा सांध्यांमधे तीव्र वेदना होतात आणि सूज येते. पण याचे परिणाम त्वचेवरही दिसून येतात. त्यामुळे यापुढे जर जखमा भरायला वेळ लागत असेल किंवा सूज कमी होत नसेल तर ही लक्षणं युरिक अॅसिड वाढल्याची असू शकतात.
युरिक अॅसिड क्रिस्टल्स केवळ सांध्यातच नाही तर त्वचेखाली देखील जमा होऊ शकतात, ज्यामुळे विविध लक्षणं दिसून येतात. पुढे सांगितलेली पाच लक्षणं आढळली तर वेळीच सावध व्हा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर आणि योग्य उपचार करता येतील.
advertisement
त्वचेवर वेदनादायक गाठी - यूरिक अॅसिड वाढलं की, सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्वचेखाली लहान, कठीण गाठी तयार होणं. या गाठी बहुतेकदा कान, बोटं, कोपर आणि घोट्यांभोवती दिसतात. त्या कधीकधी वेदनादायक असू शकतात. गाठी खूप मोठ्या झाल्या तर त्यामधून पांढरा, खडूसारखा पदार्थ देखील बाहेर पडू शकतो.
त्वचेचा रंग बदलणं - सांध्याभोवती युरिक अॅसिडचे स्फटिक जमा होतात तेव्हा त्या भागातील त्वचा लाल किंवा जांभळी होऊ शकते. सूज आणि जळजळीमुळे हे होऊ शकतं. त्वचा ताणलेली आणि चमकदार दिसू शकते. सांध्यावर त्वचेच्या रंगात अचानक बदल दिसला तर हे एक गंभीर धोक्याचं लक्षण असू शकतं.
advertisement
लाल किंवा जांभळे डाग - युरिक अॅसिडचं प्रमाण वाढल्यानं त्वचेवर लाल किंवा जांभळे डाग दिसू शकतात. हे डाग बहुतेकदा सांध्याभोवती दिसतात. हे शरीरात काहीतरी अयोग्य असल्याचं लक्षण आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका.
त्वचेला खाज सुटणं - काहींना युरिक अॅसिडचं प्रमाण वाढल्यामुळेही त्वचेला खाज येऊ शकते. त्वचेच्या वरच्या थराखाली युरिक अॅसिडचे स्फटिक जमा होतात, ज्यामुळे जळजळ आणि खाज येते तेव्हा असं होऊ शकतं. कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय सतत खाज येत असेल, तर युरिक अॅसिडची पातळी तपासणंं महत्त्वाचं ठरेल.
advertisement
जखमा हळूहळू बऱ्या होणं - वाढलेल्या यूरिक अॅसिडचं प्रमाण केवळ सांध्यांवरच नाही तर शरीराच्या आतही परिणाम करतं. यामुळे सूज वाढू शकते, ज्यामुळे जखमा बऱ्या होण्यास जास्त वेळ लागू शकतो. किरकोळ जखमा बऱ्या होण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणं हे देखील एक लक्षण असू शकतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2025 2:53 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Uric Acid : त्वचेवरही दिसतात युरिक अॅसिड वाढल्याची लक्षणं, या हेल्थ टिप्सचा होईल फायदा