High BP : ब्लड प्रेशरला सायलेंट किलर का म्हणतात ? रक्तदाब वाढला तर शरीरात नेमकं काय होतं ?

Last Updated:

बीपी आहे म्हटल्यावर केवळ लठ्ठपणा, जास्त मीठ किंवा दीर्घकालीन ताणामुळे होतो असा बहुतेकांचा समज असतो. पण इतरही अनेक अदृश्य कारणं देखील त्यासाठी जबाबदार असू शकतात. जाणून घेऊयात,  रक्तदाबाच्या काही अन्य कारणांबद्दल..या कारणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

News18
News18
मुंबई : घराघरात मधुमेह, उच्च रक्तदाबाची समस्या वाढत चालली आहे. ही आज एक सामान्य पण गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. उच्च रक्तदाबाला "सायलेंट किलर" असंही म्हणतात. कारण याची लक्षणं ठळकपणे दिसत नसली तरी यामुळे शरीराला गंभीर नुकसान पोहोचू शकतं.
बीपी आहे म्हटल्यावर केवळ लठ्ठपणा, जास्त मीठ किंवा दीर्घकालीन ताणामुळे होतो असा बहुतेकांचा समज असतो. पण इतरही अनेक अदृश्य कारणं देखील त्यासाठी जबाबदार असू शकतात. जाणून घेऊयात,  रक्तदाबाच्या काही अन्य कारणांबद्दल..या कारणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
advertisement
जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेलं अन्न खाणं - प्रक्रिया केलेलं अन्न आणि पॅकेज केलेल्या स्नॅक्समधे लपलेलं जास्त सोडियम हळूहळू तुमचा रक्तदाब वाढवू शकतं. त्यामुळे जेवणात किती मीठ वापरलं जातं याकडे लक्ष द्या.
झोपेचा अभाव - दररोज पुरेशी गाढ झोप न घेतल्यानं शरीरात ताण संप्रेरकं वाढतात, ज्यामुळे रक्तदाबात असंतुलन निर्माण होऊ शकतं.
advertisement
जास्त प्रमाणात कॅफिन आणि अल्कोहोलचं सेवन - कॅफिन, दारू आणि अल्कोहोल दोन्ही तात्पुरत्या स्वरुपात किंवा रक्तदाब कायमस्वरुपी वाढवू शकतात. नियमितपणे आणि जास्त प्रमाणात सेवन केलं तर हा त्रास नक्की वाढतो.
दीर्घकालीन मानसिक ताण - मानसिक ताण आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे शरीरात कॉर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्या पसरू शकतात आणि रक्तदाब वाढू शकतो.
advertisement
औषधांचे दुष्परिणाम - वेदनाशामक, कंजेस्टंट आणि हार्मोनल ही काही सामान्य औषधं, रक्तदाब वाढवू शकतात.
थायरॉईड असंतुलन - थायरॉईड संप्रेरक असंतुलन म्हणजेच हायपोथायरॉईडीझम किंवा हायपरथायरॉईडीझम  यामुळे रक्ताभिसरण प्रणालीवर परिणाम होतो आणि रक्तदाब व्यवस्थित राहत नाही.
पोटॅशियमची कमतरता - पोटॅशियमचं महत्त्वाचं काम म्हणजे सोडियमच्या परिणामांना संतुलित करणं. पण पोटॅशियम कमी असेल तर शरीरात सोडियमची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.
advertisement
वय आणि अनुवांशिक घटक - वयानुसार धमन्या कडक होतात आणि कुटुंबात उच्च रक्तदाबाचा इतिहास असेल तर धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
उच्च रक्तदाब हा केवळ चुकीच्या आहाराचा परिणाम नाही. खरं तर, झोप, ताणतणाव, औषधं आणि शरीरातील बदल ही देखील प्रमुख कारणं असू शकतात. ही लपलेली कारणं लवकर ओळखणं आणि जीवनशैली त्यानुसार सुधारणं ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
High BP : ब्लड प्रेशरला सायलेंट किलर का म्हणतात ? रक्तदाब वाढला तर शरीरात नेमकं काय होतं ?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement