Ayurvedic Kadha benefits: वातावरण बदलाचा त्रास होतोय ? आजारी पडायचं नाहीये ? मग प्या ‘हा’ काढा, राहाल तंदुरूस्त आणि फिट

Last Updated:

Health benefits of Ayurvedic Kadha in Marathi : आयुर्वेदात अशा अनेक काढे आणि हर्बल टीचा उल्लेख आहे, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करून सर्दी आणि खोकल्याच्या त्रासापासून आराम देऊ शकतात. हा काढा पूर्णपणे नैसर्गिक, आयुर्वेदिक आणि केमिकल फ्री आहे, ज्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

News18
News18
मुंबई : बदलत्या वातावारणामुळे अनेकांना थंडी वाजून घाम फुटू लागलाय. वाक्य वाचताना चमत्कारीक आणि चुकीचं जरी वाटत असलं तरीही ही आत्ताची स्थिती आहे. सकाळी भरपूर उन आणि रात्री थंडी अशी स्थिती राज्यात अनेक ठिकाणी दिसून येतेय. अद्यापही अधिकृतपणे उन्हाळ्याची घोषणा हवामान खात्याने केली नसली तरीही फेब्रुवारी महिन्यातच वैशाख वणव्याच्या झळा अनेकांना बसू लागल्यात. हा वातावरण बदल अनेकांनासाठी धोक्याचा ठरू शकतो. बदलत्या हवामानात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे विषाणूजन्य संसर्गाचा धोका देखील वाढतो. सर्दी, खोकला, घसा खवखवणे, आणि तापाच्या समस्या डोकं वर काढू लागतात. जर तुम्हालाही अशा आजारांचा सामना करावा लागत असेल आणि औषधं घेण्यापेक्षा तुम्हाला काही घरगुती, आयुर्वेदिक औषधोपचार करायचे असतील तर ‘हा’ काढा तुमच्यासाठी वरदान ठरेल.

घरगुती काढा, आजारांवर रामबाण उपाय

आज आपण एका अशा आयुर्वेदिक काढ्याबद्दल बोलणार आहोत जो दिसायला एका हर्बल टी प्रमाणे आणि बनवायला अगदी चहाप्रमाणेच साधा आणि सोपा आहे. आयुर्वेदात अशा अनेक काढे आणि हर्बल टीचा उल्लेख आहे, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करून सर्दी आणि खोकल्याच्या त्रासापासून आराम देऊ शकतात. हा काढा पूर्णपणे नैसर्गिक, आयुर्वेदिक आणि केमिकल फ्री आहे, ज्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. जाणून घेऊयात सर्दी आणि खोकल्यासाठी फायदेशीर असलेल्या एका प्रभावी घरगुती काढ्याबद्दल किंवा हर्बल टी बद्दल. हा काढा किंवा हर्बल टी बनवण्यासाठी तुम्हाला तुळस, लवंग , काळीमिरी, दालचीनी, आलं, हळद पावडर लिंबू आणि मधाची गरज आहे.
advertisement
काढ्याचे औषधी गुणधर्म
आपल्याला माहितीच आहे की, हळद ही नैसर्गिक अँटिबायोटिक म्हणून ओळखली जाते. आल्यामध्ये असलेले दाहक-विरोधी घटक घशातील सूज कमी करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. काळी मिरी बंद नाक उघडण्यास मदत करते आणि शरीर उबदार ठेवते. लवंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे संसर्गापासून संरक्षण करतात. दालचिनी घसा खवखवण्याचा त्रास कमी करून छातीत साठलेला कफ दूर करण्यास मदत करते. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन घटक शरीरातील जळजळ कमी करतात आणि संसर्गाशी लढतात. त्याच वेळी, मध किंवा गुळामुळे या काढल्या फक्त चवच येत नाही तर  केवळ घशालाही  आराम मिळतो. लिंबात व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. त्यामुळे या सगळ्या पदार्थांनी बनलेल्या या काढ्यात किंवा हर्बल टीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत, ज्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा त्रासांपासून आराम मिळतो.
advertisement
Health benefits of Ayurvedic Kadha in Marathi: वातावरण बदलाचा त्रास होतोय ? आजारी पडायचं नाहीये ? मग प्या ‘हा’ काढा, राहाल तंदुरूस्त आणि फिट
काढा बनवण्यासाठी आवश्यक साहित्य
  • 7 ते 8 तुळशीची पाने
  • 1 आल्याचा तुकडा किंवा थोडसं किसलेलं आलं,
  • 4 ते 5 काळी मिरीचे दाणे
  • 2 ते 3 लवंगा
  • दालचिनीचा 1 छोटा तुकडा
  • अर्धा चमचा हळद
  • लिंबाचा रस (आवडीनुसार)
  • गूळ किंवा मध (आवडीनुसार)
  • पाणी २ कप
advertisement
काढा किंवा आयुर्वेदिक हर्बल टी बनवण्याची पद्धत
  • सर्वप्रथम, एका भांड्यामध्ये 2 कप पाणी घेऊन ते मंद आचेवर गरम करा.
  • त्यात तुळशीची पानं, आलं, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी घाला.
  • आता ते सगळं मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं उकळवा.
  • यानंतर त्यात हळद पावडर आणि गूळ घालून आणि आणखी 3 मिनिटं उकळवा.
  • पाणी उकळून अर्ध झाल्यानंतर गॅस बंद करा आणि काढा गाळून घ्या.
  • आता त्यात लिंबाचा रस घाला.
  • हा काढा कोमट किंवा गरम रूपात प्यायल्याने घशाला आराम मिळतो.
advertisement
Health benefits of Ayurvedic Kadha in Marathi: वातावरण बदलाचा त्रास होतोय ? आजारी पडायचं नाहीये ? मग प्या ‘हा’ काढा, राहाल तंदुरूस्त आणि फिट

काढा केव्हा फायदेशीर ?

जेव्हा तुम्हाला सर्दी किंवा खोकल्याचा त्रास जाणवू लागतो तेव्हा दिवसातून दोनदा (सकाळी आणि रात्री) हा काढा प्यायल्याने तुम्हाला अधिक फायदा होईल. हा काढा तुम्ही रिकाम्या पोटी किंवा खाल्ल्यानंतर ३० मिनिटांनी पिऊ शकता. जर तुम्हाला सर्दी, खोकल्याचा जास्तच त्रास असेल किंवा तुमचा ताप 2 दिवसांपेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ayurvedic Kadha benefits: वातावरण बदलाचा त्रास होतोय ? आजारी पडायचं नाहीये ? मग प्या ‘हा’ काढा, राहाल तंदुरूस्त आणि फिट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement