Healthy Recipes : उकळत्या पाण्यात पूरी टाका आणि.... तेलाशिवाय अशा बनवा हेल्दी पुऱ्या, गृहिणींनो रेसिपी लगेच जाणून घ्या

Last Updated:

पुरी आणि पिवळी बटाट्याची भाजी किंवा पुरी आणि श्रीखंड आठवलं तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटेल. हे असं पदार्थ आहेत की समोर दिसले तर कोणी त्याला नाही बोलूच शकत नाही. पण हे असे तळलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले नाही.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : घरात पुऱ्या झाल्या की सगळेच नेहमीपेक्षा दुप्पट जेवतात. कढईतून बाहेर येणारी टमाटम फुगलेली, गरमागरम पूरी पाहिल्यावर कोणाचं मन थांबेल? पुरी आणि पिवळी बटाट्याची भाजी किंवा पुरी आणि श्रीखंड आठवलं तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटेल. हे असं पदार्थ आहेत की समोर दिसले तर कोणी त्याला नाही बोलूच शकत नाही. पण हे असे तळलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले नाही. तेलात खूप कॅलरी असतात आणि ज्यांना कोलेस्ट्रॉल, डायबेटिस, लठ्ठपणा यांसारख्या समस्या आहेत त्यांच्यासाठी पूऱ्या मर्यादित खाणं गरजेचं असतं.
पण तुम्हाला माहिती आहे का की विनातेलातही पुऱ्या बनवता येतात आणि त्या चवीला पण छान लागतात? चला हे कसं बनवायचं जाणून घेऊ.
हेल्दी विना तेलातल्या पुऱ्या कशा बनवायच्या?
पिठ मळा:
1-2 कप गव्हाचं पीठ किंवा मैदा घ्या. त्यात मीठ, 2 मोठे चमचे आंबट दही आणि पाणी टाकून घट्टसर पिठ मळा. नंतर ते पिठ सुती कपड्याने झाकून अर्धा तास ठेवा.
advertisement
तेलाऐवजी पाणी:
कढईत तेलाऐवजी अर्धा कप पाणी घाला आणि उकळी आणा. पूऱ्या लाटून घ्या आणि त्या उकळी आलेल्या पाण्यात सोडा आणि 2-3 मिनिटं शिजवा. जेव्हा पूरी वर तरंगू लागेल तेव्हा बाहेर काढा.
एअर फ्राय:
या पूऱ्या नंतर एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये ठेवा आणि 200°C वर 5 मिनिटं एअर फ्राय करा. (एअर फ्रायर नसल्यास ऑनलाइन किंवा होम अप्लायंसेस स्टोअरमध्ये मिळतो.)
advertisement
फायदे
तेलाचा वापर नाही - कमी कॅलरी
डायबेटिस, लठ्ठपणा असणाऱ्यांसाठीही सुरक्षित
नेहमी खाता येईल - तेलामुळे महिन्यातून एकदाच खाण्याची मर्यादा नाही
अशा प्रकारे तुम्ही बिनातेल पूड्या करून घरच्यांना खाऊ घालू शकता, आणि चवीत फारसा फरकही जाणवत नाही.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Healthy Recipes : उकळत्या पाण्यात पूरी टाका आणि.... तेलाशिवाय अशा बनवा हेल्दी पुऱ्या, गृहिणींनो रेसिपी लगेच जाणून घ्या
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement