advertisement

Holi 2024 : होळीला रंग खेळण्यापूर्वी अशी घ्या त्वचा, केस आणि डोळ्यांची काळजी; वापरा या खास टिप्स

Last Updated:

बाजारात मिळणारे रंग हे रसायनयुक्त असल्याने त्वचा, केसांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे रंग खेळण्यापूर्वी त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

होळीला रंग खेळण्यापूर्वी अशी घ्या त्वचा, केस आणि डोळ्यांची काळजी; वापरा या खास टिप्स
होळीला रंग खेळण्यापूर्वी अशी घ्या त्वचा, केस आणि डोळ्यांची काळजी; वापरा या खास टिप्स
होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीला रंगांची उधळण केली जाते. रंग खेळत हे सण साजरे केले जातात. या सणांच्या दिवशी आपण कुटुंबीय, नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींसोबत मनसोक्त रंग खेळत आनंद साजरा करतो. या सणांसाठी काही जण घरी तयार केलेले रंग वापरतात तर काही जण बाजारातून रेडिमेड रंग आणतात. बाजारात मिळणारे रंग हे रसायनयुक्त असल्याने त्वचा, केसांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे रंग खेळण्यापूर्वी त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
होळी हा प्रेम आणि रंगांचा सण आहे. फाल्गुन महिना सुरू होताच आपल्याला होळी, धुलिवंदन, रंगपंचमी या सणांचे वेध लागतात. हे सण आपण मित्र, नातेवाईकांसोबत रंग खेळून आनंदाने साजरे करतो. काही ठिकाणी लोक विविध रंगांऐवजी गुलालानं होळी खेळतात तर काही ठिकाणी फुलांचा वापर केला जातो. काही लोक खेळण्यासाठी घरी तयार केलेले रंग वापरतात तर बहुतांश लोक बाजारात मिळणारे रसायनयुक्त रंग वापरतात. रंग कोणताही असला तरी त्याचा आपल्या त्वचेवर विपरित परिणाम होऊ नये यासाठी पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काही टिप्स फायदेशीर ठरू शकतात.
advertisement
जर तुम्ही होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीला रंग खेळण्याचं नियोजन करत असाल तर आत्तापासून त्वचा मॉईश्चराईज करायला सुरुवात करा. यामुळे रंगांचा त्वचेवर विपरित परिणाम होणार नाही. आता उन्हाळा सुरू झाला आहे. तुम्ही भर उन्हात होळी खेळणार असाल तर त्वचेवर सनस्क्रिन लावावे. त्वचा नाजूक, संवेदनशील असेल तर सनस्क्रिन लावल्याने त्वचेवरचा थर कायम राहतो आणि रंगाचा दुष्परिणाम होत नाही. सनस्क्रीन ऐवजी तुम्ही त्वचेवर खोबरेल तेल लावू शकता. रंग खेळण्यापूर्वी त्वचा आणि केसांना खोबरेल तेल लावावं. या तेलामुळे रंगाचे दुष्परिणाम टळतील.
advertisement
खोबरेल तेलाप्रमाणेच तुम्ही रंगांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी बदामाचं तेल वापरू शकता. रंग खेळण्यापूर्वी तुम्ही सर्व अंगाला बदामाचं तेल लावू शकता. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असते. हे तेल लावल्याने त्वचेवर संरक्षक थर तयार होतो. हे तेल लावल्यास रंगांमुळे होणारे त्वचेचे नुकसान टळतं. याशिवाय चेहरा आणि संपूर्ण शरीरावर होळी खेळण्यापूर्वी बदामाचं तेल लावलं तर त्वचेवर तेलाचा चिकटपणा राहात नाही.
advertisement
तुम्ही जर हे उपाय न करता रंग खेळलात तर तो धुवून काढताना विशेष काळजी घ्यावी. त्वचेवरचा रंग काढताना त्वचा घासू नका. काहीवेळ पाण्याखाली उभं राहावं. साध्या साबणाचा वापर करून रंग काढावा. त्वचेवरचा रंग काढण्यासाठी लिंबू, दही, हळद आणि थोडं पीठ एकत्र करावं आणि त्याचा साबणासारखा वापर करावा. जर तुमच्या डोळ्यात रंग किंवा रंगाचं पाणी गेलं तर सावधगिरी बाळगावी. अशा वेळी स्वच्छ आणि थंड पाणी असलेल्या नळाच्या पाण्याने हळूवार डोळे धुवावेत. सर्व रंग धुवून गेल्यावर डोळ्यांची आग आणि खाज थांबेल. डोळ्यात रंग गेला तर वेगानं पापण्यांची उघडझाप करा. त्यामुळे डोळ्यातला रंग बाहेर येईल. असं करूनही रंग डोळ्यात तसाच राहिला तर तुमचा चेहरा एका मोठ्या भांड्यात बुडवा आणि पाण्यात डोळे उघडझाप करा.
advertisement
डोळ्यात रंग गेला तर डोळे चोळू नका. यामुळे रंगातले घातक घटक डोळ्यातील बाहुलीवर दुष्परिणाम करू शकतात आणि रंग डोळ्यात खोलवर जाऊ शकतो. जर रंग निघून गेल्यावर डोळ्यात कोरडेपणा जाणवत असेल तर ल्यूब्रिकंट आय ड्रॉपचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Holi 2024 : होळीला रंग खेळण्यापूर्वी अशी घ्या त्वचा, केस आणि डोळ्यांची काळजी; वापरा या खास टिप्स
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement