advertisement

Holi 2024 : होळीला कपड्यांवर लागलेले रंग एका वॉशमध्येच निघतील, 3 सोप्या ट्रिक्स येतील कामी

Last Updated:

होळी खेळताना काहीवेळा पक्क्या रंगांचा वापरही केला जातो, अशावेळी कपड्यांवर लागलेले रंग कितीही धुतले तरी निघत नाहीत.

होळीला कपड्यांवर लागलेले रंग एका वॉशमध्येच निघतील, 3 सोप्या ट्रिक्स येतील कामी
होळीला कपड्यांवर लागलेले रंग एका वॉशमध्येच निघतील, 3 सोप्या ट्रिक्स येतील कामी
होळीचा उत्सव जवळ आल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी 25 मार्च रोजी देशभरात होळीचा उत्सव साजरा केला जाणार असून या निमित्ताने लोक एकमेकांना रंग लावून आनंद साजरा करतात. होळी खेळताना काहीवेळा पक्क्या रंगांचा वापरही केला जातो, अशावेळी कपड्यांवर लागलेले रंग कितीही धुतले तरी निघत नाहीत. शेवटी असे कपडे फेकून द्यावे लागतात. परंतु आता असं होणार नाही. कारण कपड्यांवर कितीही हट्टी रंग लागला असेल तरी 3 घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही हा रंग काढू शकता.
लिंबू :
लिंबूचा वापर करून तुम्ही कपड्यांवर लागेलेले रंगांचे डाग अगदी सहज स्वच्छ करू शकता. यासाठी एका भांड्यात लिंबूचा रस काढून घ्या आणि मग रंग लागलेल्या ठिकाणी हा रस लावा. थोडा वेळा रस लावून कपडे असेच राहुद्यात आणि मग कपडे गरम पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. अशाप्रकारे तुम्ही कपड्यांवर लागलेले होळीचे हट्टी रंग अगदी सहज काढू शकता.
advertisement
दही :
कपड्यांवर लागलेले रंगांचे डाग दूर करण्यासाठी तुम्ही दहीचा वापर करू शकता. रंगाचे डाग लागलेल्या ठिकाणी तुम्ही घट्ट दही लावा आणि ते जवळपास तासभर उन्हात ठेवा. मग काहीवेळाने साबणाने स्वच्छ धुवून टाका. अशाने कपड्यांवर लागलेले रंग निघून जाण्यास मदत होईल.
advertisement
व्हिनेगर :
कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा देखील वापर करू शकता. कपड्यावर ज्या ठिकाणी रंगांचे डाग पडले आहेत अशा ठिकाणी व्हिनेगर टाकून अर्धातास पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे कपड्यांवरील डाग दूर होतील आणि रंग पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल.
(सदर मजकूर हा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा दिलेल्या उपायांची खात्री न्यूज 18 मराठी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Holi 2024 : होळीला कपड्यांवर लागलेले रंग एका वॉशमध्येच निघतील, 3 सोप्या ट्रिक्स येतील कामी
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement