Cough Relief : खोकल्यामुळे रात्रभर झोप लागतं नाही? किचनमधील 4 पदार्थांनी मिळेल आराम, लागेल शांत झोप
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी किचनमधील काही मसाले उपयोगी ठरू शकतात.
बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप अशा आरोग्याशी निगडित समस्या जाणवू लागतात. काहीवेळा घश्यात कफ जमा झाल्याने रात्रभर खोकला येऊन अनेकजण हैराण होतात आणि झोप मोड देखील होते. तेव्हा खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी किचनमधील काही मसाले उपयोगी ठरू शकतात.
काळीमिरी : किचनमध्ये काळीमिरीचा उपयोग विविध पदार्थ बनवताना केला जातो. परंतु ही काळीमिरी खूप गुणकारी देखील असून यात अँटी माइक्रोबियल गुण आढळतात जे आरोग्याशी निगडित अनेक समस्या दूर करतात. काळीमिरीच्या सेवनाने कफ बाहेर पडण्यास मदत होते.
दालचिनी : दालचिनी हा पदार्थ देखील जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात असतो. कफ, सर्दी, खोकला इत्यादींपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही दालचिनीचे सेवन करू शकता. अँटी माइक्रोबियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणांनी भरपूर असलेला हा मसाला श्वासनलिकेत तयार होणाऱ्या बॅक्टेरियाची संक्रमण दूर करण्यासाठी प्रभावी ठरतो. दालचिनीचे सेवन केल्याने श्वसनलिकेतील सूज कमी होते आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
advertisement
लवंग : खोकला, सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. लवंगामध्ये युजेनॅक नावाचे एक महत्त्वाचे संयुग असते, ज्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. खोकल्यामध्ये लवंगाचे सेवन केल्यास आराम मिळतो.
वेलची : पदार्थांची चव वाढवण्यासाठी वेलचीचा उपयोग केला जातो. वेलचीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे कफ दूर करण्यासाठी महत्वाचे ठरतात. वेलची हानिकारक बॅक्टेरिया दूर करून खोकल्यामध्ये आराम पोहोचवते ज्यामुळे सर्दी आणि खोकल्या पासून आराम मिळतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 10, 2024 5:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cough Relief : खोकल्यामुळे रात्रभर झोप लागतं नाही? किचनमधील 4 पदार्थांनी मिळेल आराम, लागेल शांत झोप