Child Winter Care Tips: हिवाळ्यात चिमुरड्यांची घ्या ‘अशी’ काळजी; राहतील एकदम फिट, पडणार नाहीत आजारी

Last Updated:

Child Winter Care Tips: लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे थंडीत मुलांच्या आजारपणात वाढ होते. जर तुम्हाला वाटतंय की तुमचा मुलगा किंवा मुलगी थंडीत आजारी पडू नये त्यांनी फिट राहावं तर तुम्हाला त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

प्रतिकात्मक फोटो :  हिवाळ्यात चिमुरड्यांची घ्या ‘अशी’ काळजी; राहतील फिट, पडणार नाहीत आजारी
प्रतिकात्मक फोटो : हिवाळ्यात चिमुरड्यांची घ्या ‘अशी’ काळजी; राहतील फिट, पडणार नाहीत आजारी
मुंबई : हिवाळ्यात वातावरण बदलामुळे अनेक व्यक्ती आजारी पडतात. प्रदूषण आणि थंडीसमोर जिथे प्रौढ व्यक्तीची रोग प्रतिकारक शक्ती कमी पडते तिथे लहान मुलांचा विचार न केलेलाच बरा. हिवाळा हा लहान मुलांसाठी कठीण काळ असतो. कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे थंडीत लहान मुलांच्या आजारपणात वाढ होते. जर तुम्हाला वाटतंय की तुमचा मुलगा किंवा मुलगी थंडीत आजारी पडू नये त्यांनी फिट राहावं. मग तुम्हाला त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

जाणून घेऊयात हिवाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी या बाबत तज्ज्ञांचा सल्ला

Child Winter Care Tips: हिवाळ्यात चिमुरड्यांची घ्या ‘अशी’ काळजी; राहतील फिट, पडणार नाहीत आजारी

मुलांना उबदार कपडे घाला

हिवाळ्यात मुलांना उबदार कपडे घालणे आणि त्यांचे हात आणि पाय झाकून ठेवणे खूप महत्वाचे आहे. यामुळे त्यांचं थंड हवेपासून रक्षण होतं. जर लहान मुलांना थंडी बाधली तर त्यांना थंडीतला अतिसार आणि न्यूमोनियासारखे आजार होतात.
advertisement

थंडीतला अतिसार

थंडीतला अतिसार टाळण्यासाठी अधिक स्वच्छता राखण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मुलांना उकळून, थंड करून गाळून पाणी दिलं तर त्यांना फायदा होऊ शकतो. झाकलेलं अन्न खाणं हे केव्हाही फायद्याचं असतं. मात्र हिवाळ्यात उघडं अन्न खाणं प्रकर्षानं टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
advertisement

स्तनपान चालू ठेवा

मुल जर नवजात असेल तर त्यांचं स्तनपान हे सुरूच ठेवणे फार महत्वाचं आहे कारण आईच्या दुधात असेलल्या पोषक तत्त्वांमुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत व्हायला मदत होते. नवजात मुलं हिवाळ्याच आजारी पडण्याचा धोका अधिक असतो, त्यामुळे पालकांना मुलांच्या आरोग्याबाबत सतर्क राहावं असं तज्ज्ञ सांगतात
advertisement
मुलांना भरपूर पाणी द्या.
हिवाळ्यात अनेकदा आपल्याला तहान लागत नाही. त्यामुळे लहान मुलंही पाणी पिण्यास टाळाटाळ करतात. मात्र दर दोन तासांनी पालकांनी आपल्या मुलांना पाणी द्यायला हवं असा सल्ला डॉक्टर देतात. ठराविक अंतराने पाणी प्यायल्याने  शरीर हायड्रेट राहायला मदत होते, त्यामुळे संक्रमित आजारांचा धोका टाळता येतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Child Winter Care Tips: हिवाळ्यात चिमुरड्यांची घ्या ‘अशी’ काळजी; राहतील एकदम फिट, पडणार नाहीत आजारी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement