₹1 लाखात करा दुबईची 7 दिवसांची सफर! IRCTC घेऊन आले 'ख्रिसमस स्पेशल टूर' पॅकेज, वाचा सविस्तर

Last Updated:

IRCTC Tour Package : ख्रिसमसच्या सुट्टीत दुबईच्या उंच इमारती, दिव्यांची रोषणाई आणि वाळवंटातील सफारी अनुभवण्याचं स्वप्न तुम्हीही पाहताय का? अनेकदा आंतरराष्ट्रीय प्रवासाचे...

IRCTC Tour Package
IRCTC Tour Package
IRCTC Tour Package : ख्रिसमसच्या सुट्टीत दुबईच्या उंच इमारती, दिव्यांची रोषणाई आणि वाळवंटातील सफारी अनुभवण्याचं स्वप्न तुम्हीही पाहताय का? अनेकदा आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियोजन, व्हिसा, हॉटेल बुकिंग आणि फिरण्याचा खर्च या विचारांनीच आपण आपला प्लॅन मागे टाकतो. पण आता तुमची ही चिंता दूर होणार आहे.
तुमच्या याच स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आणि प्रवासाची चिंता दूर करण्यासाठी, भारतीय रेल्वे (IRCTC) एक शानदार पॅकेज घेऊन आले आहे - 'DUBAI CHRISTMAS DELIGHT'. या पॅकेजमध्ये तुम्हाला फक्त तुमची बॅग भरायची आहे; बाकी विमानाची तिकीटं, राहण्याची सोय, फिरण्याची व्यवस्था आणि अगदी टूर गाईडपर्यंत सर्व गोष्टींची काळजी रेल्वे घेणार आहे.
7 दिवसांचा अविस्मरणीय प्रवास
हे टूर पॅकेज खास इंदूरमधून प्रवास करणाऱ्यांसाठी असून, 22 डिसेंबर रोजी या प्रवासाला सुरुवात होईल. 6 रात्री आणि 7 दिवसांच्या या सफरीत तुम्ही दुबई आणि अबू धाबी या दोन्ही शहरांची भव्यता अनुभवू शकाल. या प्रवासात तुम्हाला जगातली सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाच्या 124 व्या मजल्यावर जाण्याची संधी मिळेल. वाळवंटात डेझर्ट सफारीचा थरार अनुभवता येईल आणि सोबतच बार्बेक्यू डिनरचा आस्वादही घेता येईल. याशिवाय, तुम्ही दुबई मॉल, मिरॅकल गार्डन, अबू धाबीची भव्य शेख जायद मशीद आणि BAPS मंदिरालाही भेट द्याल.
advertisement
तुमच्या बजेटमध्ये बसणारा खर्च : IRCTC ने हे पॅकेज वेगवेगळ्या गटांसाठी तयार केले आहे. तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत प्रवास करत असाल, तर हा खर्च आणखी कमी होतो.
  • तुम्ही एकट्याने प्रवास करणार असाल तर ₹127000, पण कुटुंबासोबत असाल तर हे पॅकेज जास्त फायद्याचे ठरतं.
  • 2 लोकांसाठी हे पॅकेज प्रति व्यक्ती ₹106500 आहे, तर तीन व्यक्तींसाठी प्रति व्यक्ती ₹104800 आहे.
  • लहान मुलांसाठी हे पॅकेज ₹98700 आहे.
advertisement
IRCTC च्या टूर पॅकेजवरील मिळणाऱ्या सुविधा वाचल्यानंतर तिकिट बुक करा. भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर तिकिट बुक करण्याची सोपी सुविधा उपलब्ध आहे.
या पॅकेजमध्ये काय काय मिळणार?
  1. IRCTC च्या या पॅकेजमध्ये तुमच्या प्रवासाची आणि आरामाची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
  2. विमान प्रवास : एअर इंडियाच्या विमानाचे येण्या-जाण्याचे तिकीट.
  3. राहण्याची सोय : ३-स्टार हॉटेलमध्ये आरामदायी वास्तव्य.
  4. जेवणाची व्यवस्था : रोज सकाळचा नाश्ता (Breakfast) आणि रात्रीचे जेवण (Dinner). (दुपारच्या जेवणाचा खर्च स्वतः करावा लागेल.)
  5. फिरण्याची सोय : पर्यटनासाठी एसी डिलक्स बसची सुविधा.
  6. मार्गदर्शक : विमानतळापासून इंग्रजी बोलणारा टूर गाईड तुमच्यासोबत असेल.
  7. विमा : 80 वर्षांपर्यंतच्या प्रवाशांसाठी प्रवास विमा (Travel Insurance) समाविष्ट.
advertisement
थोडक्यात, तुम्हाला फक्त बॅग भरायची आहे आणि प्रवासाला निघायचं आहे. ख्रिसमसचा हा आनंद दुबईमध्ये साजरा करण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका. मर्यादित जागा असल्यामुळे, लवकरात लवकर IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून तुमचे पॅकेज बुक करा.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
₹1 लाखात करा दुबईची 7 दिवसांची सफर! IRCTC घेऊन आले 'ख्रिसमस स्पेशल टूर' पॅकेज, वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement