Intermittent fasting: वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग? नको रे बाबा, फायद्यांऐवजी होईल नुकसान

Last Updated:

Disadvantages of Intermittent fasting in Marathi: वजन कमी करण्यासाठी सध्या अनेक जण इंटरमिटंट फास्टिंगला पसंती देत आहे. मात्र हे इंटरमिटंट फास्टिंग आरोग्यासाठी खरंच फायद्याचं आहे का ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.

प्रतिकात्मक फोटो : वजन कमी करण्यासाठी करता इंटरमिटंट फास्टिंग?
प्रतिकात्मक फोटो : वजन कमी करण्यासाठी करता इंटरमिटंट फास्टिंग?
मुंबई: आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढतं वजन ही एक समस्या झालीये. वजन कमी करण्यासाठी अनेक पर्यायांचा अवलंब केला जातो. काही जण कमी जेवतात, काही जण फ्रुट डाएट करतात, तर काही जण रात्री जेवतच नाहीच. वजन कमी करण्सासाठी गेल्या काही वर्षात इंटरमिटंट फास्टिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढतोय. वजन कमी करण्यासाठी अनेक जण इंटरमिटंट फास्टिंगला पसंती देत आहे. मात्र हे इंटरमिटंट फास्टिंग आरोग्यासाठी खरंच फायद्याचं आहे का? इंटरमिटंट फास्टिंगमुळे खरच वजन कमी होतं का ? की, शरीरातले अतिरिक्त फॅट्स म्हणजेच चरबी जळायला मदत होते? जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं .

इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे नेमकं काय ?

काही वर्षांपूर्वी देवधर्म किंवा आधात्माचा एक भाग म्हणून अनेक जण उपवास करायचे. त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग  हा एक सुद्धा एक प्रकारचा उपवास आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मात्र अधात्मातल्या उपवासांपेक्षा हा उपवास वेगळा आहे. इंटरमिटंट फास्टिंग हा उपवासाचा असा प्रकार आहे की, या प्रकारच्या उपवासात तुम्ही काहीही खाऊ शकता. मात्र तुम्हाला ठराविक वेळेतच खायचं आहे आणि उरलेल्या वेळेत उपाशी राहायचं आहे. जसे आध्यात्मिक उपवासाचे अनेक प्रकार आहेत, तसेच प्रकार हे इंटरमिटंट फास्टिंगचे सुद्धा आहेत. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये 14/10, 16/8 आणि 5/2 असे प्रकार आहेत. त्यापैकी, 16/8 हा प्रकार भलताच लोकप्रिय होतोय.
advertisement

काय आहे 16/8 इंटरमिटंट फास्टिंग

Disadvantages of Intermittent fasting: वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग करता? फायद्याऐवजी होईल नुकसान, आरोग्यावरही होतील दूरगामी परिणाम
दिवसातल्या 24 तासांपैकी 16 तास तुम्हाला उपवास करायचा आहे किंवा उपाशी राहायचं आहे आणि उरलेल्या 8 तासांमध्ये तुम्ही खायचं आहे. या 8 तासात तुम्ही केव्हाही, काहीही खाऊ शकता. याच प्रमाणे 14/10 प्रकारात 14 तास उपाशी राहायचं आहे आणि उरलेल्या 10 तासात काहीही खाता येतं. 5/2 प्रकाराच्या नावावरून तुम्हाला असं वाटू शकतं की, 5 तास उपाशी राहून 2 तास खायचं आहे. असं दिवसातून 2 वेळा करायचं आहे तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. मुळातच 5/2 या प्रकारात आठवड्यातून 5 दिवस खायचं आहे आणि 2 दिवस उपाशी राहायचं आहे. उपवासाचा किंवा इंटरमिटंट फास्टिंगचा हा एक कठिण प्रकार आहे. याशिवाय 5/2 प्रकारातला उपवास करताना सलग 2 दिवस उपाशी राहायचं नाहीये.
advertisement
इंटरमिटंट फास्टिंगबाबत तज्ज्ञांचं मत काय ?
प्रसिद्ध यकृत तज्ज्ञ डॉ. एस.के. सरीन यांचा इंटरमिटंट फास्टिंगला विरोध आहे. त्यांच्यामते इंटरमिटंट फास्टिंग ही निरोगी जीवनशैली होऊ शकत नाही. यामुळे कमी वेळात वजन भलेही कमी होत असेल मात्र त्याचे दूरगामी परिणाम हे आरोग्यावर होऊ शकतात. त्यामुळे बराच काळ उपाशी राहून एकाचवेळी भरपेट खाण्याने नुकसान होऊ शकतं. त्यापेक्षा वेळेवर मर्यादित आहार घेणं हे केव्हाही फायद्याचं.
advertisement

इंटरमिटंट फास्टिंगबाबत का धोक्याचं ?

इंटरमिटंट फास्टिंगचे काही नियम आहे. मात्र हे करताना अनेकजण बराचवेळ उपाशी राहतात. उदा. जे लोक 5/2 प्रकारतलं फास्टिंग करतात त्यात त्यांना असं वाटंत की सलग 2 दिवस काही खायचं नाही. मात्र हे चुकीचं आहे. सतत बराच वेळ उपाशी राहिल्याने शरीरावर आणि हृदयावर ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
advertisement

इंटरमिटंट फास्टिंगऐवजी उपवास फायद्याचा

इंटरमिटंट फास्टिंग ही वजन कमी करण्याची चांगली पद्धत नाहीये. कारण उपाशी राहिल्यामुळे तुमची चरबी जळून फॅटलॉस व्हायला मदत होते. मात्र यामुळे जे वजन कमी होते ते क्षणिक किंवा काही काळासाठी ठरू शकतं. कारण तुमचा फॅटलॉस होतोय वेटलॉस नाही. जस तुम्हाला खरच वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला जीवशैली सुधारून पोषक आहारासोबत व्यायामाची सवय लावून घ्यावी लागेल जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या शरीराला दीर्घकालीन फायदे होऊ शकतील.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Intermittent fasting: वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग? नको रे बाबा, फायद्यांऐवजी होईल नुकसान
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement