मुलांवर लक्ष द्या! पोलिसांनी खेळतानाच घेतलं ताब्यात अन् धाडलं बालसुधारगृहात
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
चालत्या गाडीवर दगडफेक करून नये. असं करणं प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतं. रुळांवर पडलेल्या दगडांमुळे रेल्वे अपघात घडू शकतो.
ओम प्रकाश निरंजन, प्रतिनिधी
कोडरमा, 21 डिसेंबर : मुलं चालायला-बोलायला शिकली, शाळेत जायला लागली की, आई-वडील 24 तास त्यांच्यावर लक्ष ठेवू शकत नाहीत. परंतु कधीकधी मुलांचे खेळच इतके भयंकर असतात की, ते त्यांच्यासह आई-वडिलांनाही गोत्यात आणतात. एकाठिकाणी तर चक्क 4 अल्पवयीन मुलांना खेळतानाच पोलिसांनी ताब्यात घेतलं, नेमकं काय घडलं पाहूया.
हे प्रकरण आहे झारखंडच्या कोडरमा-गिरिडीह स्थानकावरील. इथून धावणाऱ्या न्यू गिरिडीह-रांची एक्स्प्रेसमध्ये एक पारदर्शक कोच आहे. त्यामुळे प्रवाशांना आजूबाजूला जंगल, डोंगर, नद्या आणि धबधबे पाहत आनंदात प्रवास करता येतो. परंतु मागील काही दिवसांपासून इथली एक भयंकर घटना चांगलीच चर्चेत आली आहे.
advertisement
त्याचं झालं असं की, एक्स्प्रेसचे लोको पायलट विनोद कुमार यादव यांनी रेल्वे रुळांवर दगड असल्याची माहिती आरपीएफ (Railway Protection Force) कोडरमाला दिली होती. त्यानंतर आरपीएफकडून कोडरमा-गिरिडीहदरम्यानच्या रुळांवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं. अधिकाऱ्यांनी गुप्त व्हिडीओ घ्यायला सुरुवात केली.
advertisement
सखोल तपासानंतर आरपीएफच्या जवानांनी महेशपूर बजरंगबली चौकातून सौरभ प्रसाद, धीरेंद्र कुमार, रंजीत कुमार आणि प्रवीण शर्माला एक खेळ खेळताना ताब्यात घेतलं. चौकशीत चौघांनीही आपण रेल्वे रुळांवर दगडफेक केल्याचं कबूल केलं. चौघंही अल्पवयीन असून त्यांनी सांगितलं की, आम्ही एक्स्प्रेस आल्यावर तिच्या काचेवर निशाणा लावून दगड मारण्याचा खेळ खेळायचो. दरम्यान, त्यांना न्यू गिरिडीह-रांची एक्स्प्रेसच्या काचेवर दगड मारताना पकडण्यात आलं. त्यानंतर बालसुधारगृहात धाडलं आहे.
advertisement
आरपीएफ कोडरमाचे अधिकारी जवाहरलाल यांनी सर्वांना विनंती केली की, 'चालत्या गाडीवर दगडफेक करून नये. असं करणं प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतं. रुळांवर पडलेल्या दगडांमुळे रेल्वे अपघात घडू शकतो. शिवाय आपल्या प्राण्यांनादेखील रेल्वे रुळांपासून दूर ठेवावं. त्याचबरोबर रेल्वेची ओव्हरहेड व्हायर आणि विजेच्या खांबांवरही दगड फेकू नये', असं ते म्हणाले.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
Location :
Jharkhand
First Published :
December 21, 2023 9:51 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मुलांवर लक्ष द्या! पोलिसांनी खेळतानाच घेतलं ताब्यात अन् धाडलं बालसुधारगृहात