Kidney Stone : किती मोठा किडनी स्टोन लघवीद्वारे बाहेर पडू शकतो? डॉक्टरांकडून जाणून घ्या आवश्यक गोष्टी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
मोठ्या संख्येने लोक किडनी स्टोनच्या समस्येशी झुंज देत आहेत. किडनी स्टोनचा आकार लहान असतो, त्यामुळे तो लघवीद्वारे शरीराबाहेर जातो. जेव्हा त्याचा आकार मोठा असतो तेव्हा ते मूत्रवाहिनी किंवा मूत्राशयात अडकू शकते. अशा परिस्थितीत, शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.
मुंबई : किडनी स्टोनला मुतखडा असे म्हणतात. जेव्हा अतिरीक्त क्षार एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून लघवीद्वारे काढून टाकता येत नाहीत आणि मूत्रपिंडात जमा होतात, तेव्हा दगड तयार होतात. किडनी स्टोन होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कमी पाणी पिणे. याशिवाय जास्त मीठ खाल्ल्याने देखील किडनी स्टोन होऊ शकतो. अनेक वेळा लोकांच्या किडनीमध्ये छोटे-छोटे खडे तयार होत राहतात आणि ते लघवीद्वारे बाहेर पडतात. तर काहीवेळा हे स्टोन मूत्रमार्गे बाहेर पडू शकत नाही आणि मूत्रवाहिनी किंवा मूत्राशयात अडकतात.
साधारणपणे, 5 मिमी किंवा त्यापेक्षा कमी आकाराचा किडनी स्टोन लघवीद्वारे सहज बाहेर जाऊ शकतो, तर यापेक्षा मोठा दगड बाहेर जाण्याची शक्यता कमी असते. डॉ. प्रशांत कुमार, सल्लागार, युरोलॉजी विभाग, फोर्टिस हॉस्पिटल (ग्रेटर नोएडा) यांच्या मते, 5 मिमी आकारापर्यंतचा दगड सहज काढता येतो. 5 मिमी नंतर, दगडाचा आकार जसजसा वाढतो, लघवीद्वारे तो शरीरातून बाहेर पडण्याची शक्यता कमी होते.
advertisement
स्टोन, किडनीला सूज किंवा इन्फेक्शनमुळे लघवीत रक्त येत असेल तर अशा स्थितीत शस्त्रक्रिया करावी लागू शकते. मात्र, कधीकधी 4 मिमीचा दगड देखील मूत्रवाहिनी किंवा मूत्राशयात अडकतो आणि काही प्रकरणांमध्ये 10 मिमीचा दगड देखील लघवीद्वारे बाहेर पडतो. जरी हे क्वचितच घडते. डॉ. प्रशांत कुमार यांच्या म्हणण्यानुसार, मूत्रमार्गात किंवा मूत्राशयात किडनी स्टोन अडकल्यास लोकांनी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत.
advertisement
लेसरच्या सहाय्याने तो तोडून बाहेर काढता येतो. याला कोणत्याही प्रकारची चीर लागत नाही आणि तो सहज काढता येते. जर दगडाचा आकार मोठा असेल तर तो लवकरात लवकर काढावा. विशेषतः जर दगडाचा आकार 20 मिमी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो लेझर आणि इतर प्रकारच्या शस्त्रक्रियांद्वारे तोडून बाहेर काढता येतो. अशा स्थितीत लोकांनी जास्त वेळ थांबू नये, अन्यथा किडनी खराब होण्याचा धोका असतो.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, किडनी स्टोनच्या रुग्णांनी पाणी प्यावे आणि मिठाचे सेवन कमी करावे. भरपूर फळे आणि भाज्या खा आणि नियमित शारीरिक हालचाली करा. घामाने आपल्या शरीरातून मीठ निघून जाते आणि दगड होण्याचा धोका कमी होतो. एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोनची समस्या असल्यास त्याने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत. याकडे दुर्लक्ष केल्याने किडनी खराब होण्याचा धोका आहे. याबाबत गांभीर्याने विचार व्हायला हवा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 04, 2024 8:04 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kidney Stone : किती मोठा किडनी स्टोन लघवीद्वारे बाहेर पडू शकतो? डॉक्टरांकडून जाणून घ्या आवश्यक गोष्टी








