Lack Of Sleep Effect : अपुऱ्या झोपेमुळे डोक्यात होतो 'केमिकल लोचा', या आजाराची भीती, रिसर्चनं दिला इशारा
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आजच्या धकाधकीच्या जीवनात रात्रीची पुरेशी झोप मिळवणे अनेकांसाठी एक आव्हान बनले आहे. पण, आरोग्य तज्ञांच्या मते, अपुरी झोप केवळ थकवा आणत नाही, तर ती भविष्यात स्मृतिभ्रंशाचा धोकाही वाढवू शकते.
Disturb Sleep Can Increases Risk OF Dementia : आजच्या धकाधकीच्या जीवनात रात्रीची पुरेशी झोप मिळवणे अनेकांसाठी एक आव्हान बनले आहे. पण, आरोग्य तज्ञांच्या मते, अपुरी झोप केवळ थकवा आणत नाही, तर ती भविष्यात स्मृतिभ्रंशाचा धोकाही वाढवू शकते. एका गंभीर अभ्यासातून या गोष्टीचा थेट संबंध समोर आला आहे. रात्री उशिरा झोपल्याने
किंवा अपुऱ्या झोपेमुळे दुसऱ्या दिवसाची ऊर्जा तर कमी होतेच, पण दीर्घकाळ झोप न लागल्यामुळे (क्रॉनिक इन्सोम्निया) मेंदूत असे काही बदल घडतात की ज्यामुळे भविष्यात स्मृतिभ्रंशाचा (डिमेन्शिया) धोका निर्माण होतो, असे एका अमेरिकन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेतील मेयो क्लिनिक येथील संशोधकांनी 50 वर्षावरील 2,750 व्यक्तींचा सरासरी साडेपाच वर्षे अभ्यास प्रतिबंधक उपाय लवकर सुरू करणे केला. दरवर्षी त्यांची स्मरणशक्ती तपासण्यात आली. अनेकांचा मेंदू स्कॅन करण्यात आला. या स्कॅनमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टींची नोंद झाली. एक मेंदूत साचणारे अमायलॉइड प्लॅक्स व दुसरे व्हाईट मॅटर हायपरइंटेन्सिटीस म्हणून ओळखली जाणारी सूक्ष्म हानी. मेयो क्लिनिकच्या अभ्यासातील स्वयंसेवकांचे सरासरी वय सुरुवातीला 70 होते. पण इतर संशोधनांनी दाखविले आहे की, 50व्या वर्षांमध्ये रोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना पुढे डिमेन्शियाचा धोका लक्षणीयरीत्या
advertisement
वाढतो.
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंश का होतो?
मेंदूतील स्मृतीवर परिणाम
झोपेदरम्यान, विशेषतः गाढ झोपेच्या वेळी, आपला मेंदू दिवसातील सर्व माहिती आणि आठवणी एकत्र करतो. अपुऱ्या झोपेमुळे ही प्रक्रिया व्यवस्थित होत नाही, त्यामुळे विस्मरण होण्याची शक्यता वाढते.
विषारी पदार्थांचा निचरा
झोपेच्या वेळी मेंदू स्वतःला स्वच्छ करतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. यात बीटा-अमायलॉइड नावाच्या प्रोटीनचा समावेश असतो, जो अल्झायमर रोगाशी जोडला गेला आहे.
advertisement
विषारी पदार्थांचा साठा
जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा मेंदूतील हे विषारी पदार्थ व्यवस्थित बाहेर काढले जात नाहीत. ते हळूहळू मेंदूत जमा होतात, ज्यामुळे कालांतराने मेंदूच्या पेशींना नुकसान पोहोचते.
दीर्घकाळासाठीचा धोका
डॉक्टरांच्या मते, एक-दोन रात्री कमी झोप घेतल्याने मोठा फरक पडणार नाही. पण, जर तुम्ही महिनोन्महिने किंवा वर्षांनुवर्षे अपुऱ्या झोपेच्या समस्येने त्रस्त असाल, तर स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
advertisement
शिकण्याची क्षमता कमी होते
झोप केवळ स्मृतीसाठी नाही, तर नवीन गोष्टी शिकण्यासाठीही आवश्यक आहे. कमी झोपेमुळे एकाग्रता आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते.
डॉक्टरांचा सल्ला काय आहे?
आरोग्य तज्ञ म्हणतात की, एका प्रौढ व्यक्तीला दररोज किमान 7-8 तास झोप आवश्यक आहे. झोपेच्या वेळेचे वेळापत्रक पाळा, स्क्रीनचा वापर कमी करा आणि चांगली झोप मिळवण्याला प्राधान्य द्या. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 11:57 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Lack Of Sleep Effect : अपुऱ्या झोपेमुळे डोक्यात होतो 'केमिकल लोचा', या आजाराची भीती, रिसर्चनं दिला इशारा