फणीवर गाणी वाजवण्याची अनोखी कला, मुंबईकर कलाकाराची थेट लिम्का बुकात नोंद, Video

Last Updated:

मुंबईकर शशिकांत खानविलकर हे कंगवा आणि बेस्टच्या तिकिटाच्या सहाय्याने गाणी वाजवतात. त्यांच्या या कलेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालीय.

+
फणीवर

फणीवर गाणी वाजवण्याची अनोखी कला, मुंबईकर कलाकाराची थेट लिम्का बुकात नोंद, Video

लतिका तेजाळे, प्रतिनिधी
मुंबई: हार्मोनियम, ऑर्गन, सतार, विणा ही सूरवाद्यं.. तबला, ढोलकी, डफ, मृदूंग ही तालवाद्यं.. बासरी, सनई, तुतारी ही सुषिरवाद्यं.. वाद्यांचं हेच वर्गीकरण आपण खूप पूर्वीपासून करत आलोय. पण आपल्या रोजच्या वापरातला कंगवा हे सूर, ताल आणि सुषिरवाद्यही आहे. हे किती जणांना माहीत आहे? कंगव्याचा भांग पाडणं इतकाच उपयोग आपल्याला माहीत आहे. पण एका कलाकाराला कंगव्यातले सूर, ताल, लय दिसले आणि त्यावर संगीत वाजवण्याचा प्रयत्न केला. फणीवर गाणी वाजवण्याची अनोखी कला मुंबईकर कलाकाराने आत्मसात केली. 2008 साली या आगळ्या-वेगळ्या संगीत साधनेची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनही घेतली. त्यामुळे आणखी एक मराठी नाव विक्रमादित्यांच्या यादीत मानानं जाऊन बसलं. ते नाव म्हणजे 61 वर्षीय शशिकांत खानविलकर होय.
advertisement
फणीवर गाणी अनोखी कला
कंगव्याभोवती बेस्ट बसचे तिकीट गुंडाळले की शशिकांत खानविलकर यांचे वाद्य वाजण्यासाठी सज्ज होतात. 'फणी आणि गाणी' नामक 3 तासांचा कार्यक्रम ते करतात. कार्यक्रमाची सुरुवात ही कंगव्याने वाजवलेल्या तुतारीने होते. कारण तुतारीपासूनच खानविलकरांच्या या संगीतसाधनेची सुरुवात झाली होती.
advertisement
कशी झाली सुरूवात?
खानविलकरांना कलेची आवड तशी शाळेपासूनच होती. "कंगव्यातले सूर पहिल्यांदा शाळेतच सापडले. खानविलकर शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात दरवर्षी एकतरी नाटक बसवायचे. त्यात राजाच्या एंट्रीला तुतारी हवी होती. परंतु साधनांची कमतरता असल्याने कंगव्यातून प्रथमच तुतारीचा प्रयोग केला. तेव्हा नव्या वाद्याचा शोध लागला. या कलेचे शाळेत भरपूर कौतुक झाले. त्यामुळे काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा ध्यास घेतला आणि तुतारीसोबत मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती गाणी वाजवत गेलो, शिकत गेलो, आजही शिकतोय," असे शशिकांत खानविलकर यांनी सांगितले.
advertisement
'फणी आणि गाणी'चे अनेक प्रयोग
फणी आणि बसचे तिकीट खानविलकरांच्या खिशात नेहमी असते. फणी आणि गाणी या कार्यक्रमाचे आजवर भरपूर प्रयोग झाले आहेत. विक्रोळी परिसरात कुठल्याही राजकीय सभेत तुतारी वाजवण्यासाठी खानविलकरांना निमंत्रण असतं. विशेष म्हणजे 72 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटनही खानविलकरांच्या तुतारीने झाले होते. हा सगळा अनोखा प्रवास पाहून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही दखल घेत खानविलकरांना विक्रमाचं प्रमाणपत्र दिलं आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
फणीवर गाणी वाजवण्याची अनोखी कला, मुंबईकर कलाकाराची थेट लिम्का बुकात नोंद, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement