उमेदीच्या काळात गाजवलं कुस्तीचं मैदान, म्हातारपणी शेळ्या राखून जगण्याची वेळ, Video

Last Updated:

देशपातळीवर सोलापूर जिल्ह्याचे नाव गाजवणारा पैलवान सध्या हलाखीचे जीवन जगत आहे. शेळ्या राखून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.

+
उमेदीच्या

उमेदीच्या काळात गाजवलं कुस्तीचं मैदान, म्हातारपणी शेळ्या राखून जगण्याची वेळ

प्रसाद दिवाणजी, प्रतिनिधी
सोलापूर : महाराष्ट्राच्या मातीतील लोकप्रिय खेळ म्हणजे कुस्ती होय. एक काळ असा होता जेव्हा गावोगावी पैलवान तयार होत होते. सोलापूर जिल्हासुद्धा अस्सल मल्लांसाठी ओळखळा जातो. या जिल्ह्यात अनेक नामवंत मल्ल घडले आणि आताही घडत आहेत. पण उमेदीच्या काळात कुस्तीचे फड गाजवणाऱ्या राष्ट्रीय मल्लावर म्हातारपणी शेळ्या राखून जगण्याची वेळ आलीय. वाल्मिकी माने असं या 65 वर्षीय मल्लाचं नाव असून ते मोहोळ तालुक्यातील हराळवाडीचे आहेत. देशपातळीवर जिल्ह्याचे नाव गाजवणारा हा खेळाडू आता हलाखीचे जीवन जगत आहे.
advertisement
कसा होता व्यायाम?
"लहानपणापासूनच कुस्तीचा नाद होता. सकाळी मी 300 बैठका आणि 400 जोर मारायचो. पुढे मी महाराष्ट्र चॅम्पियन झालो. त्यानंतर दीड हजार बैठका आणि तीन हजार जोर मारायला सुरुवात केली. व्यायाम करून माझे शरीर मजबूत लाकडासारखे झाले होते. त्यानंतर गावोगावी यात्रांमध्ये मी कुस्त्या मारत सुटलो. पुढे सोलापूरच्या पत्रा तालमीत मेहनत करून अनेक मैदाने मारली. राज्य आणि देशपातळीवर अनेक कुस्ती स्पर्धा खेळल्या व अनेक पदकं मिळवली. सोलापूरच्या सिद्धेश्वर आखाड्यातही मी लढलो आहे. एकनाथ धोडमिसे हे आमचे वस्ताद होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी राज्य व देश पातळीवर कुस्ती खेळलो," असे माने यांनी सांगितले.
advertisement
राष्ट्रीय स्पर्धा गाजवली
पुढे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला. शिमल्यात 1979 साली भारतीय कुस्ती महासंघाच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा झाल्या. यामध्ये माने यांनी चौथ्या क्रमांकपर्यंत धडक दिली. तर देशभरातील अनेक ठिकाणची कुस्तीची मैदाने जिंकून सुवर्णपदकांची कमाई केली. महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यांतील प्रसिद्ध पैलवानांना मी आस्मान दाखवले, असं पैलवान वाल्मिकी माने सांगतात.
advertisement
शेळ्या राखून जगण्याची वेळ
पैलवान वाल्मिकी माने यांनी आपला उमेदीचा काळ कुस्तीच्या फडात गाजवला. अनेक मैदाने मारली. मात्र, म्हातारपणात त्यांच्यावर संघर्षाची वेळ आली आहे. सध्या ते शेळ्या राखून आपला उदरनिर्वाह करत आहेत. तरीही तरुणांना कुस्तीचे धडे देण्याची आवड आहे, असेही माने सांगतात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
उमेदीच्या काळात गाजवलं कुस्तीचं मैदान, म्हातारपणी शेळ्या राखून जगण्याची वेळ, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement