थकवा अन् मूड स्विंग्स... नाईट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम; डॉक्टरांनी दिल्या ३ बेस्ट टिप्स
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
आजकाल अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये दिवस आणि रात्र अशा दोन शिफ्ट मध्ये कर्मचाऱ्यांना काम करावे लागते.मात्र रात्री काम कर्मचाऱ्यांना गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते.
आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी सर्वच जण खूप मेहनत करत असतात. बहुतेक ऑफिसची वेळ 10 ते 6 पर्यंत असते, परंतु अनेक ऑफिसमध्ये वेगवेगळ्या शिफ्ट असतात. अशा परिस्थितीत कधी मॉर्निग शिफ्टमध्ये तर कधी नाईट शिफ्टमध्ये काम करावं लागतं. पण बरेच लोक कायमस्वरूपी नाइट शिफ्टमध्ये काम करतात, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण दिनक्रम बदलतो.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम होतो. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना डॉ.अविनाश भोंडवे यांनी दिली. नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. ते तंदुरुस्त, उत्साही आणि सक्रिय वाटत नाहीत. आरोग्यासंबंधी अनेक तक्रारी असतात. त्यांना थकवा, अशक्तपणा जाणवतो आणि पचनाचा त्रास होतो. त्यामुळे नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यामुळे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहतील.
advertisement
डॉ.अविनाश भोंडवे म्हणाले की, "नाईट शिफ्टमुळे डिप्रेशनचा धोका वाढतो, मोठ्या प्रमाणावर मूड स्विंग्स होतात, डायबिटिस होण्याची शक्यता, ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढते आणि झोपेची कमतरता असल्याने अनेक गंभीर गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाईट शिफ्ट असलेला जॉब करत असताना आरोग्य, मानसिक स्थिती, जेवणाच्या वेळी पाळणे गरजेचे आहे. हे खरंच गरजेचं आहे पण काही लोकांसाठी हे प्रॅक्टिकली शक्य नाही. त्यामुळे नाइट शिफ्ट करताना काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्या."
advertisement
काय काळजी घ्यावी
- रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत जास्त काही खाऊ नये. त्यामुळे अपचन होऊन ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
- भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. रात्री स्नॅक्स खाणं टाळून पाणी पिणे महत्वाचे आहे.
- प्रोटीन आणि फायबरयुक्त जेवण करा. रात्रीचं जेवण पोषकत्त्वांनी परिपूर्ण असावं. अंडी, पनीर आणि फळ यांचा जेवणात समावेश असावा.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 2:24 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
थकवा अन् मूड स्विंग्स... नाईट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम; डॉक्टरांनी दिल्या ३ बेस्ट टिप्स

