एक्सरसाइज करत नाही म्हणून नाही, तर 'हे' आहे वजन वाढण्यामागचं खरं कारण, तुम्हाला माहितीय का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्रीयलायजेशनमुळे आपली फिजिकल अॅक्टिविटी कमी झाली, म्हणून वजन वाढतंय असं आपण गृहित धरतो. पण यामागचं खरं कारण काहीसं वेगळंच आहे, असं अमेरिकेतील ड्यूक युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
मुंबई : हल्ली लोकांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत. मोठ्या शहरातील लोकांच्या वजनात तर हा फरक आवर्जून दिसतो. हा वाढत चाललेला लठ्ठपणा अनेकदा कमी शारीरिक हालचालीमुळे होतो, असा आपला समज असतो. म्हणजेच टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्रीयलायजेशनमुळे आपली फिजिकल अॅक्टिविटी कमी झाली, म्हणून वजन वाढतंय असं आपण गृहित धरतो. पण यामागचं खरं कारण काहीसं वेगळंच आहे, असं अमेरिकेतील ड्यूक युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
केवळ हालचाल कमी झाली म्हणून वजन वाढलं का?
ड्यूक युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर हरमन पोंटजर यांच्या नेतृत्वात झालेल्या एका स्टडीत हे स्पष्ट झालं की, मोठ्या शहरांमधले लोक पूर्वीइतकीच, किंबहुना काही वेळा त्याहून जास्त ऊर्जा दररोज खर्च करत असतात. म्हणजेच शरीराची हालचाल फारशी कमी झालेली नाही. त्यामुळे वजन वाढण्यामागचं मुख्य कारण फिजिकल अॅक्टिविटी नाही, तर आहारातील बदल आहे, असं संशोधनातून समोर आलं आहे.
advertisement
शोधकर्त्यांनी 18 ते 60 वयोगटातील 4200 हून अधिक लोकांचा अभ्यास केला. हे लोक जगभरातील 34 वेगवेगळ्या भागांतील होते. त्यांचं दररोजचं एनर्जी एक्स्पेंडिचर (ऊर्जा खर्च), शरीरातील चरबीचं प्रमाण आणि बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) यांचा सखोल अभ्यास करण्यात आला.
निष्कर्ष काय लागला?
शोधात असं दिसून आलं की, जसे-जसे देश अमीर होत गेले, तसतशी लोकांची एकूण ऊर्जा खर्च थोडीशी कमी झाली खरी, पण वजन वाढण्यामागे तिचा वाटा फारसा नाही. उलट, खाण्याच्या सवयींमध्ये झालेले बदलच यासाठी जबाबदार आहेत. मोठ्या भागांमध्ये लोकांचे आहार अधिक प्रोसेस्ड, हाय कॅलोरी आणि लो नुट्रिशन असतात. त्यामुळे शरीरात चरबी साठू लागते आणि लठ्ठपणा वाढतो.
advertisement
या स्टडीचा अर्थ असा नाही की फिजिकल अॅक्टिविटी किंवा फक्त व्यायाम महत्त्वाचा नाही. व्यायाम हा शरीरासाठी आवश्यक आहेच. पण वजन कमी करायचं असल्यास फक्त व्यायाम करून उपयोग नाही, तर त्याबरोबर आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. म्हणजेच डाएट आणि एक्सरसाइज हे दोन्ही परस्परपूरक आहेत, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
हे लक्षात ठेवा: लठ्ठपणा टाळायचा असेल, तर फक्त हालचाल नव्हे, तर आपण काय खातो, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे बाहेरचं किंवा प्रोसेस्ड फुड खाऊ नका. हेल्दी खा हेल्दी राहा.
advertisement
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 22, 2025 8:31 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
एक्सरसाइज करत नाही म्हणून नाही, तर 'हे' आहे वजन वाढण्यामागचं खरं कारण, तुम्हाला माहितीय का?