Pineapple Cutting Hack : परफेक्ट कापलं जाईल अननस, शेफ नेहा दीप प्रकाश यांनी सांगितली सोपी पद्धत!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Perfect hack for cutting pineapple : सोशल मीडियावर आपल्या सोप्या रेसिपीजसाठी प्रसिद्ध असलेल्या शेफ नेहा दीप प्रकाश यांनी अननस कापण्याचा असा एक 'मॅजिकल' उपाय शेअर केला आहे, जो मुलंही फॉलो करून स्वतः अननस कापू शकता.
मुंबई : फळे खाणे जितके आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच काही फळे कापणे आव्हानात्मक असते. त्यामध्ये सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे अननसाचं. त्याचा कडक कवच आणि काटेरी रचना यामुळे अनेकजण ते घरी आणणे टाळतात किंवा बाजारातून कापलेलाच विकत घेतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्सने अननस कसे कापायचे हे सांगणार आहोत.
सोशल मीडियावर आपल्या सोप्या रेसिपीजसाठी प्रसिद्ध असलेल्या शेफ नेहा दीप प्रकाश यांनी अननस कापण्याचा असा एक 'मॅजिकल' उपाय शेअर केला आहे, जो मुलंही फॉलो करून स्वतः अननस कापू शकता. साधारणपणे अननस कापताना खूप वेळ जातो आणि बरेचसे फळ वाया जाते. शेफ नेहांनी त्यांच्या अलीकडील व्हिडिओमध्ये सांगितले की, अननस कापण्याची अजिबात गरज नाही. त्यांनी सांगितलेली कापण्याची पद्धत खूपच सोपी आहे.
advertisement
या पद्धतीने काप अननस..
क्राउन कापून काढा : सर्वात आधी अननसाचा वरचा भाग (हिरव्या पानांचा भाग, ज्याला क्राउन म्हणतात) सुरीने कापून वेगळा करा.
दोन भागांत कापा : आता अननसाला मधोमध सरळ दोन भागांत कापा. यामुळे फळाचा आतला भाग स्पष्टपणे दिसेल.
नैसर्गिक रेषा फॉलो करा : अननसाचे कवच नीट पाहिल्यास त्यावर नैसर्गिकरीत्या डायमंड शेपच्या रेषा दिसतात. शेफ नेहांची हीच ट्रिक आहे. या नैसर्गिक रेषांमधील जो गॅप असतो, त्या दोन रेषांच्या मधून सुरी खोलवर चालवत जा.
advertisement
बाइट तयार : या रेषांनुसार कट लावताच अननसाचे छोटे-छोटे त्रिकोणी ‘बाइट्स’ आपोआप वेगळे होऊ लागतात. तुम्हाला फक्त एक पीस धरून बाहेर काढायचा आहे आणि तुमचा फ्रेश अननस बाइट खाण्यासाठी तयार आहे.
advertisement
या पद्धतीचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे यात अननसाचे कडक कवच काढण्याची मेहनत घ्यावी लागत नाही. शेफ नेहांच्या या हॅकमुळे अननसाचा सोल नैसर्गिक वाटीसारखा काम करतो आणि तुम्ही हात न घाण करता एक-एक पीसचा आनंद घेऊ शकता. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही किचनमध्ये अननस कापताना हा सोपा उपाय नक्की फॉलो करा. या स्मार्ट पद्धतीचा वापर करून तुम्ही योग्य तंत्राने हे कठीण वाटणारे काम क्षणात करू शकता.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 5:26 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pineapple Cutting Hack : परफेक्ट कापलं जाईल अननस, शेफ नेहा दीप प्रकाश यांनी सांगितली सोपी पद्धत!








