Jewellery Shopping : गौरी-गणपतीच्या सणासाठी खरेदी करा पारंपरिक दागिने, किंमतही स्वस्त, मुंबईत हे आहे लोकेशन
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
गौरी-गणपतीच्या स्वागतासाठी पारंपरिक पद्धतीने सजण्यासाठी महिलांना आवडणारे दागिने येथे वाजवी दरात उपलब्ध झाले आहेत.
मुंबई: गौरी-गणपतीचा सण काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. दादरमधील स्वामी मठाच्या गल्लीत असलेल्या हिरकणी या प्रसिद्ध दागिन्यांच्या दुकानात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खास आकर्षक आणि ट्रेंडी कलेक्शन ठेवण्यात आलं आहे. गौरी-गणपतीच्या स्वागतासाठी पारंपरिक पद्धतीने सजण्यासाठी महिलांना आवडणारे दागिने येथे वाजवी दरात उपलब्ध झाले आहेत.
झुमके, हार, नथ, चोकर, बांगड्या, तोडे, कर्णफुले, बाजूबंद, हेअर बन्स अशा अनेक प्रकारांमध्ये प्रीमियम क्वालिटीचे दागिने येथे विक्रीस ठेवण्यात आले आहेत. या दागिन्यांची खासियत म्हणजे ते सर्व दागिने उच्च प्रतीच्या प्युअर ब्रासपासून बनवलेले आहेत. त्यामुळे त्यांना एक वेगळीच चमक असून टिकाऊपणाही अधिक आहे. पारंपरिक पोशाखांसोबत शोभून दिसणारे हे दागिने खास महिलांच्या आवडीचा विचार करून तयार करण्यात आले आहेत.
advertisement
या कलेक्शनमध्ये टेम्पल ज्वेलरी सेट, पारंपरिक कोल्हापुरी साज, टूशी यांसारखे आकर्षक दागिने 500 ते 600 रुपयांपासून मिळतात. महाराष्ट्रीयन पद्धतीचे तोडे आणि टेम्पल सेट यांची किंमत 700 रुपयांपासून सुरू होते. कर्णफुलांची किंमत 500 रुपयांपासून आहे आणि यातही विविध डिझाईन्स पाहायला मिळतात. तसेच महिलांच्या केशभूषेसाठी आवश्यक असणारे हेअर बन्सची खास रेंज येथे उपलब्ध आहे. बाजूबंदसारखे दागिने 600 ते 1200 रुपयांपर्यंत विविध व्हरायटीमध्ये विक्रीस ठेवण्यात आले आहेत.
advertisement
हिरकणी हे दुकान स्वामी मठाच्या गल्लीतील डॉट ऑफ डिझायर या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर दादर इथे आहे. अनेक ग्राहकांनी येथे येऊन दागिन्यांची विविधता, गुणवत्ता आणि किंमतीबाबत समाधान व्यक्त केलं आहे. दर्जा, व्हरायटी आणि किंमत यांचा समतोल ठेवत हे दुकान सणासुदीच्या खरेदीसाठी उत्तम पर्याय ठरत आहे. दुकान मंगळवार ते रविवार दरम्यान सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत सुरू असते. सोमवारी हे दुकान बंद असते.
advertisement
पारंपरिक आणि आधुनिक दागिने एकाच छताखाली हवे असतील, तर हिरकणी हे नाव नक्कीच लक्षात ठेवण्यासारखे आहे, असं दुकानाच्या मालक आदिती फाटक यांनी सांगितलं. महिलांच्या सौंदर्याला खुलवणारे हे खास दागिने पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी त्यांनी सर्वांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 20, 2025 7:19 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Jewellery Shopping : गौरी-गणपतीच्या सणासाठी खरेदी करा पारंपरिक दागिने, किंमतही स्वस्त, मुंबईत हे आहे लोकेशन









