होळीला थंडाई हवीये? मग विकत का आणताय? घरीच बनवा सोपी रेसिपी
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Holi Special Thandai: होळीसाठी पुरणपोळी सोबतच थंडाई देखील बनवली जाते. यंदाच्या होळीला अगदी सोप्या पद्धतीनं थंडाई बनवू शकते.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : होळी म्हटलं की सर्वत्र रंगाची उधळण होते आणि अवघं वातावरण रंगमय होऊन जातं. होळीसाठी वेगवेगळे पदार्थ देखील बनवले जातात. त्यामध्ये घरोघरी पुरणपोळी तर होतेच. पण होळीला आवर्जून एक पदार्थ केला जातो तो म्हणजे थंडाई. यंदाच्या होळीसाठी तुम्ही घरच्या घरी ही थंडाई बनवू शकता. छत्रपती संभाजीनगर येथील मेघना देशपांडे यांनी ही थंडाईची अगदी सोपी रेसिपी सांगितली आहे.
advertisement
थंडाई बनवण्याचे साहित्य
पाव वाटी बदाम, पाव वाटी काजू आणि पिस्ता, दोन टेबल स्पून मगज बी तिची पावडर करून घ्याची आहे. बडीशोप, पांढरे तीळ, काळी मिरी,खसखस, वेलची आणि जायफळ पूड हे सर्व साहित्य दोन टेबल स्पून घायचं आहे. केसर, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, पाव वाटी मिल्क पावडर एवढं साहित्य लागेल.
advertisement
थंडाईची कृती
सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी काजू, पिस्ता, मगज बी, बडीशोप, पांढरे तीळ, काळी मिरी, खसखस, वेलची आणि जायफळची पूड, केसर आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून रवाळ असं काढून घ्यायचं. बदाम 4-5 तास भिजू घालत ठेवायचे. त्यानंतर त्याचे वरचे छिलके काढून घ्यायचं आणि आणि त्यामध्ये थोडीशी पिठीसाखर आणि पाव वाटी मिल्क पावडर घालून ते मिक्सरमधून काढून घ्यायचं. थंडाई तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये तयार केलेला मसाला टाकायचा. त्यामध्ये दूध टाकून तयार झालेलं मिश्रण दोन तास तसेच मुरू द्यायचं.
advertisement
तुम्हाला जेवढी थंडाई बनवायचे आहे त्यानुसार थंड दूध घ्यायचे. हे दूध, मसाल्याचे आणि बदामाचे मिक्सर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. त्यामध्ये थोडासा बर्फ देखील टाकायचा आणि तुम्हाला जेवढं गोड लागतं त्यानुसार साखर टाकायची. हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं. तयार झालेली थंडाई सर्व्ह करण्यासाठी ग्लास मध्ये टाकून घ्यायची आणि वरून ड्रायफ्रूट्स टाकायचे. अशा अगदी सोप्या पद्धतीनं थंडाई तयार होते.
advertisement
दरम्यान, तुम्हालाही होळीला घरच्या घरी थंडाई बनवायची असेल तर ही रेसिपी अगदी सोपी आहे. नक्की ट्राय करू शकता.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
March 13, 2025 1:20 PM IST