Aloovadi Recipe : घसा खवखवणार नाही, कांदा भज्जीसारखी सुरेख होईल अळूवडी, 6 सोप्या टीप्स

Last Updated:

अळूच्या पानांतून तयार होणारी ही पारंपरिक वडी आता नव्या पिढीलाही खूपच आवडू लागली आहे. घरच्या घरी सहज तयार करता येणारी ही वडी पौष्टिक, चविष्ट आणि कुरकुरीत असते.

+
कमी

कमी साहित्य वापरून तयार करा खमंगी अशी अलूवडी !

मुंबई: पावसाळ्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अळूची पाने बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसू लागतात. त्याच वेळी पारंपरिक पाककृतींची आठवण होते आणि त्या यादीत सर्वात वर असते आलूवडी. अळूच्या पानांतून तयार होणारी ही पारंपरिक वडी आता नव्या पिढीलाही खूपच आवडू लागली आहे. घरच्या घरी सहज तयार करता येणारी ही वडी पौष्टिक, चविष्ट आणि कुरकुरीत असते. पाहुयात अळूवडी घरीच सोप्या पद्धतीने कशी बनवायची.
अळूवडी बनवण्यासाठी साहित्य
अळूची पाने – 7–8
बेसन – 1 कप
हळद, तिखट – प्रत्येकी ½ चमचा
धणे-जिरे पावडर – 1 चमचा
मीठ – चवीनुसार
तेल – तळण्यासाठी
कोथिंबीर- थोडीशी
लसूण- 5-6 पाकळ्या
आलं- थोडंसं
कढीपत्ता
अळूवडी बनवण्यासाठी कृती:
advertisement
1. अळूची पाने स्वच्छ धुवून घ्या आणि देठ काढून टाका. पानांची पाठीमागची नस थोडीशी खरवडून घ्या जेणेकरून वडी मऊसर होईल.
2. एका वाटीत बेसन, हळद, तिखट, धणे-जिरे पावडर आणि मीठ घालून त्यात लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं यांचा केलेलं मिश्रण घालून चांगले मिसळा. सोबत थोडंसं पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करा.
advertisement
3. एक अळूचं पान पाठीमागून ठेवून त्यावर थोडं मिश्रण पसरवा. त्यावर दुसरं पान ठेवा आणि पुन्हा मिश्रण लावा. अशा प्रकारे 5–6 पानं एकावर एक लावून त्याची घडी घाला.
4. घट्ट रोल करून वाफेवर 15–20 मिनिटं शिजवून घ्या.
5. वाफेवर शिजल्यानंतर थंड होऊ द्या आणि त्याच्या जाडसर चकत्या कापा.
6. तव्यावर तेल गरम करून त्या चकत्या दोन्ही बाजूंनी तपकिरी होईपर्यंत तळा.
advertisement
चहा बरोबर खाल्ल्यास किंवा जेवणात भातासोबत दिल्यास ही वडी खास चव देते. अळूच्या पानांमधील फायबर्स आणि घरगुती मसाल्याचा संगम ही वडी आरोग्यदृष्ट्याही फायदेशीर ठरते. आजच्या झटपट जीवनशैलीत अशी पारंपरिक पाककृती टिकवणं ही काळाची गरज ठरतेय.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
Aloovadi Recipe : घसा खवखवणार नाही, कांदा भज्जीसारखी सुरेख होईल अळूवडी, 6 सोप्या टीप्स
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement