Egg Bhurji Recipe : सकाळच्या नाश्ता होईल भारी, सेम भेजा फ्राय सारखी बनवा अंडा भुर्जी, रेसिपीचा संपूर्ण Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
आपल्याला सकाळच्या नाश्ता किंवा भाकरी चपातीसोबत अंडा भुर्जी करायची असल्यास, सेम भेजा फ्राय सारखी अंडा भुर्जी कमी साहित्यात घरीच बनवू शकता.
कल्याण : आपल्याला सकाळच्या नाश्ता किंवा भाकरी चपातीसोबत अंडा भुर्जी करायची असल्यास, सेम भेजा फ्राय सारखी अंडा भुर्जी कमी साहित्यात घरीच बनवू शकता. ही भुर्जी झटपट तयार होईल. तर अंडा भुर्जी कशी बनवायची याची रेसिपी पाहुयात.
अंडा भुर्जी साहित्य
4 अंडी
1 मोठा कांदा (बारीक चिरलेला)
1 मोठा टोमॅटो (बारीक चिरलेला)
1 चमचा आले-लसूण पेस्ट
(1/2) चमचा हळद
(1/2) चमचा लाल तिखट
(1/2) चमचा गरम मसाला
(1) ते (2) चमचे तेल
चवीनुसार मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर (सजावटीसाठी)
advertisement
अंडा भुर्जी कृती
view commentsएका कढईत तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. आले-लसूण, कोथिंबीर पेस्ट घालून एक मिनिट परता. बारीक चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. त्यात हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून मिक्स करा. चवीनुसार मीठ घाला. एका भांड्यात अंडी फेटून घ्या. शिजलेल्या मिश्रणात फेटलेली अंडी घाला आणि हळूवारपणे ढवळत राहा. अंडी सेट झाल्यावर आणि भुर्जीचा पोत मऊ झाल्यावर गॅस बंद करा. वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा. तुम्ही ही भुर्जी पाव, चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
November 22, 2025 7:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Egg Bhurji Recipe : सकाळच्या नाश्ता होईल भारी, सेम भेजा फ्राय सारखी बनवा अंडा भुर्जी, रेसिपीचा संपूर्ण Video

