Gul Shengdana Poli : हिवाळ्यात शरिराला पौष्टिक, घरीच बनवा गूळ शेंगदाण्यापासून पोळी, रेसिपीचा संपूर्ण Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
गूळ आणि शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आज याच गूळ शेंगदाणा मिश्रणाचा एक सोपा, पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ तयार करणार आहोत तो म्हणजे शेंगदाणा पोळी.
पुणे : हिवाळ्यात गूळ आणि शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आज याच गूळ शेंगदाणा मिश्रणाचा एक सोपा, पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ तयार करणार आहोत तो म्हणजे शेंगदाणा पोळी. ही पोळी बनवायला सोपी आहे आणि 4-5 दिवस अगदी ताजी राहते.
गूळ शेंगदाणा पोळी साहित्य
शेंगदाणे, गव्हाचे पीठ, गूळ, वेलची पावडर, मीठ, तेल हे साहित्य लागेल.
गूळ शेंगदाणा पोळी कृती
सुरुवातीला शेंगदाणे मध्यम आचेवर 4-5 मिनिटे भाजून घ्या आणि त्यांना थंड होऊ द्या. त्यानंतर गव्हाचे पीठ घेऊन त्यात चिमूटभर मीठ मिसळा. थोडं-थोडं पाणी घालत चपातीपेक्षा थोडी घट्ट अशी कणिक मळा आणि ती 15 मिनिटे झाकून ठेवा. आता गार झालेले शेंगदाणे मिक्सरमध्ये हलकेसे फिरवून भरड करा.
advertisement
त्यात पाऊण वाटी गूळ आणि अर्धा टेबलस्पून वेलची पावडर घालून पुन्हा मिक्सरमध्ये एकसारखे बारीक मिश्रण तयार करा. कणकेचा एक छोटा गोळा घ्या, त्यात गूळ शेंगदाण्याचे सारण भरा. गोळा नीट बंद करून थोडी जाडसर पोळी लाटा. तवा गरम करून मध्यम आचेवर पोळी दोन्हीकडून तेल लावून भाजून घ्या. तर अशी तयार होते तुमची चविष्ट शेंगदाणा पोळी.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 28, 2025 4:30 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Gul Shengdana Poli : हिवाळ्यात शरिराला पौष्टिक, घरीच बनवा गूळ शेंगदाण्यापासून पोळी, रेसिपीचा संपूर्ण Video









