Palak Cutlets : आरोग्यासाठी हेल्दी, घरच्या घरी बनवा पालक कटलेट रेसिपी, संपूर्ण Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आरोग्य आणि चव यांचा उत्तम समतोल साधणारी हेल्दी पालक कटलेट ही रेसिपी सध्या घराघरात लोकप्रिय होत आहे. लोह, फायबर आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेले पालक या कटलेटमुळे रोजच्या आहारात पोषणमूल्यांची भर पडते.
मुंबई : धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे अनेकदा कठीण जाते. बाहेरील जंक फूडऐवजी घरच्या घरी पौष्टिक आणि चविष्ट पर्याय निवडणे महत्त्वाचे ठरत आहे. अशातच आरोग्य आणि चव यांचा उत्तम समतोल साधणारी हेल्दी पालक कटलेट ही रेसिपी सध्या घराघरात लोकप्रिय होत आहे. लोह, फायबर आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेले पालक या कटलेटमुळे रोजच्या आहारात पोषणमूल्यांची भर पडते.
हेल्दी पालक कटलेट साहित्य
जाड पोहे – 1 वाटी
पालक – 2 वाट्या (बारीक चिरलेले)
उकडलेले बटाटे – 2
कांदा – 1 (बारीक चिरलेला)
आले-लसूण पेस्ट – 1 चमचा
जिरे – ½ चमचा
हळद – ¼ चमचा
गरम मसाला – ½ चमचा
मीठ – चवीनुसार
कोथिंबीर – थोडी
तेल – शॅलो फ्रायसाठी
advertisement
तीळ- (ऐच्छिक)
हेल्दी पालक कटलेट कृती
पालक धुवून बारीक चिरून घ्या. त्यानंतर पोहे स्वच्छ धुवून 5 मिनिटे ठेवा. आता पालक घ्या, त्यात कांदा, उकडलेला बटाटा, आले-लसूण पेस्ट आणि मसाले टाकून घ्या. त्यानंतर त्यात पोहे आणि लिंबू पिळून घ्या आणि मिक्स करून मिश्रण तयार करा. मिश्रणाच्या मध्यम आकाराच्या कटलेट तयार कराव्यात. त्याच्या दोन्ही बाजूला तीळ लावून घ्या. तव्यावर थोडे तेल घेऊन कटलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शॅलो फ्राय कराव्यात.
advertisement
आरोग्यदायी टीप
ही कटलेट एअर फ्रायर किंवा ओव्हनमध्ये भाजल्यास तेलाचा वापर कमी होतो आणि रेसिपी अधिक हेल्दी बनते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 6:40 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Palak Cutlets : आरोग्यासाठी हेल्दी, घरच्या घरी बनवा पालक कटलेट रेसिपी, संपूर्ण Video









