Kairicha Aamras : विदर्भ स्पेशल कैरीचा आमरस, अक्षय तृतीयेला बनवा घरीच, रेसिपीचा संपूर्ण Video

Last Updated:

उन्हाळ्यामध्ये कैरीपासून बनवलेल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक असलेला म्हणजे आमरस. हा आमरस पन्ह बनवतात काहीसा त्याच प्रकारे बनवला जातो. उन्हाळ्यात आवर्जून बनवला जाणारा हा पदार्थ आहे. 

+
Summer

Summer Special Recipe Aamras 

अमरावती : उन्हाळ्यामध्ये कैरीपासून बनवलेल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक असलेला म्हणजे आमरस. हा आमरस पन्ह बनवतात काहीसा त्याच प्रकारे बनवला जातो. आमरस आणि त्यासोबत रताळ्याची पुरी असा बेत अनेक वेळा विदर्भात ठरवला जातो. अक्षय तृतीयेला बनवला जाणारा आमरस हा अतिशय पारंपरिक असतो. त्यात वेगवेगळे साहित्य वापरले जातात. पण, त्याआधी साधा आमरस कसा बनवायचा? त्याची रेसिपी अमरावतीमधील वृषाली भुजाडे यांनी सांगितली आहे.
आमरस बनवण्यासाठी लागणारे साहित्य 
शिजवून घेतलेली कैरी, गव्हाचे पीठ, साखर, तूप, खोबरा किस, विलायची पावडर आणि बारीक केलेले जिर हे साहित्य लागेल.
आमरस बनवण्याची कृती
सर्वात आधी शिजवलेल्या कैरीतील गर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात थोडे पाणी टाकून त्याला रवीच्या साहाय्याने फिरवून घ्यायचा. आमरस करायला घेताना सर्वात आधी गॅसवर भांडे ठेवून त्यात तूप टाकून ते गरम होऊ द्यायचं. तूप गरम झालं की त्यात जिर टाकून घ्यायचं आहे. जिर तळतळल्यानंतर त्यात एक छोटा चमचा गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे आहे. ते गव्हाचे पीठ लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे. गव्हाचे पीठ लाल झाल्यानंतर त्यात आता कैरीचा गर टाकून टाकायचा. तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा.
advertisement
मिक्स केल्यानंतर त्यात पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तसे अंदाजानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर साखर टाकून घ्यायची. साखर टाकल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आमरसला छान उकळी आल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि खोबरा किस टाकून घ्यायचा आहे. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आमरस तयार होईल. हा आमरस तुम्ही रताळ्याची पुरी आणि सरगुंडे यासोबत खाऊ शकता. अतिशय टेस्टी लागते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Kairicha Aamras : विदर्भ स्पेशल कैरीचा आमरस, अक्षय तृतीयेला बनवा घरीच, रेसिपीचा संपूर्ण Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement