advertisement

Gajarache Gharge Recipe : हिवाळ्यात बनवा पौष्टिक गाजराचे घारगे,10 दिवस टिकेल, रेसिपीचा संपूर्ण Video

Last Updated:

सध्या बाजारात गाजराची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. आज आपण गाजरापासून एक पारंपारिक आणि पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत.

+
गाजरापासून

गाजरापासून बनवा.. 8 ते 10 दिवस टिकणारे पौष्टिक गाजराचे घारगे

पुणे: सध्या बाजारात गाजराची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. आज आपण गाजरापासून एक पारंपारिक आणि पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत. जो सुमारे 8 ते 10 दिवस टिकेल. हा पदार्थ आहे गाजराचे घारगे. गाजराचे घारगे सोप्या पद्धतीने कसे बनवायचे चला तर मग जाणून घेऊया.
गाजराचे घारगे बनवण्यासाठी लागणारं साहित्य
गाजराचा किस, गूळ, तूप, हरभरा डाळीचे पीठ, रवा, गव्हाचे पीठ, वेलची पावडर, खसखस, तेल, मीठ चवीनुसार हे साहित्य लागेल.
गाजराचे घारगे बनवण्यासाठी कृती 
सुरुवातीला गाजर स्वच्छ धुवून साली काढून बारीक किसावे. नंतर मध्यम आचेवर तूप घालून 5–6 मिनिटे परतावे. त्यात गूळ घालून 15–20 मिनिटे मंद आचेवर शिजवावे आणि थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर वेलची पावडर, मीठ, बेसन, बारीक रवा, गव्हाचे पीठ आणि 2 टेबलस्पून तेल घालून पिठाचा गोळा तयार करावा. गोळा 15–20 मिनिटे मुरवून लहान गोळे करून जाडसर पारी लाटावी, त्यावर खसखस पसरवून डब्याच्या झाकणाने समान आकारात कापावे. नंतर मध्यम आचेवर तळून थंड झाल्यावर डब्यात भरावे. अश्या रीतीने आपले गाजराचे घारगे खाण्यासाठी तयार आहेत.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
Gajarache Gharge Recipe : हिवाळ्यात बनवा पौष्टिक गाजराचे घारगे,10 दिवस टिकेल, रेसिपीचा संपूर्ण Video
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement