Orange Jelly Recipe : हिवाळ्यात शरिरासाठी फायदेशीर, घरीच करा ऑरेंज जेली, रेसीपीचा Video ‎

Last Updated:

आपण संत्र्याचा नुसता ज्यूस करून घेतो किंवा तसेच संत्री खातो. पण तुम्हाला काही वेगळी रेसिपी करायची असेल तर तुम्ही संत्र्याची जेली करू शकता.

+
घरीच‎ title=घरीच करा मार्केट सारखे ऑरेंज जेली 
‎ />

घरीच करा मार्केट सारखे ऑरेंज जेली 

छत्रपती संभाजीनगर : सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात संत्री विक्रीसाठी आलेली आहे. आपण संत्र्याचा नुसता ज्यूस करून घेतो किंवा तसेच संत्री खातो. पण तुम्हाला काही वेगळी रेसिपी करायची असेल तर तुम्ही संत्र्याची जेली करू शकता. अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते. त्यामध्ये कुठल्या प्रकारचं प्रिझर्व्हेटिव्ह किंवा इतर कुठलीही गोष्ट यामध्ये वापरली जात नाही. तर याची रेसिपी कशी करायची हे बघू.
ऑरेंज जेलीसाठी लागणारे साहित्य
एक वाटी साखर, अर्धा वाटी संत्र्याचा ज्यूस, पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर आणि एक वाटी पाणी एवढेच साहित्य याकरता लागणार आहे.
ऑरेंज जेली करण्याची कृती
सर्वप्रथम एका पॅनमध्ये साखर टाकून घ्यायची आणि त्यामध्ये अर्धा वाटी आपण जो संत्र्याचा रस घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा. याला सर्व एकत्र एकजीव करून दहा ते पंधरा मिनिटे मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण घट्ट होईपर्यंत. म्हणजे जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं. आता हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं थंड होईपर्यंत. त्यानंतर कढईमध्ये एक वाटी पाणी टाका.
advertisement
पाणी टाकताना गॅस बंद असावा आणि त्यानंतर पाऊण वाटी यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाका. सर्व एकत्र एकजीव करून घ्या त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा प्रकारे. आता गॅस लावायचा आणि याला एकजीव करून थोडं घट्ट होईपर्यंत घ्यायचं आहे. एकजीव करायचं आणि यामध्ये आपण जे संत्र्याचे मिश्रण केलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला एकजीव करून घ्यायचं. एक-दोन मिनिटे याला शिजवून घ्यायचं.
advertisement
एक डिश घ्या थोडी खोल असावी अशाप्रकारे त्याला चांगल्या प्रकारे तूप लावून घ्या आणि हे तयार केलेलं मिश्रण यामध्ये टाकून घ्या. आणि हे जे मिश्रण आहे हे दोन-तीन तास फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवून द्या. दोन-तीन तासानंतर मिश्रण बाहेर काढा त्याचे छान प्रकारे काप करा. वरतून गार्निशिंगसाठी थोडीशी पिठीसाखर टाका. अशाप्रकारे आपली झटपट कुठल्याही प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह न वापरता ऑरेंज जेली बनवून तयार होते. तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Orange Jelly Recipe : हिवाळ्यात शरिरासाठी फायदेशीर, घरीच करा ऑरेंज जेली, रेसीपीचा Video ‎
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement