नाश्त्याला नेहमीचेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? मग बनवा रवा हांडवो, आवडीने खाल

Last Updated:

दररोज सकाळी नाश्त्यासाठी काय करावे हा आपल्याला सर्वात मोठा प्रश्न असतो. पोहे आणि उपमा पेक्षा तुम्ही रवा हांडवो हा एक पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता.

+
News18

News18

अपूर्वा तळणीकर,प्रतिनिधी 
छत्रपती संभाजीनगर : दररोज सकाळी नाश्त्यासाठी काय करावे हा आपल्याला सर्वात मोठा प्रश्न असतो. आपण एकतर पोहे करतो किंवा उपमा करतो. पण नेहमी पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा येतो. यामुळे पोहे आणि उपमा पेक्षा तुम्ही रवा हांडवो हा एक पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता. रवा हांडवो ही एक गुजराती डिश आहे. तर या रवा हांडवोची रेसिपी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधील गृहीणी मेघना देशपांडे यांनी सांगितली आहे.
advertisement
रवा हांडवोसाठी लागणारे साहित्य
एक वाटी रवा, एक वाटी दही, पाणी, एक जोडी पालक, मिरची, आलं, कांदा, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मीठ, बेसन, लसूण, सोडा, तेल, जिरे, मोहरी, हिंग हे साहित्य लागेल.
रवा हांडवो कृती
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये एक वाटी रवा घ्यायचा. त्यामध्ये दही टाकायचं आणि गरजेनुसार पाणी टाकून मिश्रण तयार करून घ्यायचं. अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं. त्यांनतर दुसऱ्या बाऊलमध्ये जो आपण पालक घेतलेला आहे तो पालक टाकायचा. पालक आधी चांगला चिरून घ्यायचा. त्यानंतर त्या पालकमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा, बारीक चिरलेली मिरची, आलं, तिखट, हळद आणि तीन चमचे बेसन पीठ त्यामध्ये टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं.
advertisement
आजीच्या हातची अस्सल चव! आवळ्याच्या मुरंब्याची सोपी रेसिपी, जिभेवर ठेवताच विरघळेल
हे दोन्ही मिश्रण तयार झाले आहेत. हे दोन्ही मिश्रण एकत्र करून घ्यायचे. म्हणजे रव्याचे मिश्रण आणि पालकाचे मिश्रण एकत्र करून घ्यायचं. ते चांगलं एकजीव करायचं. त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा आणि वरतून थोडासा सोडा टाकायचा. कारण यामुळे हे मिश्रण चांगलं होतं. आता एका पॅनमध्ये फोडणी करून घ्यायची. त्यामध्ये तेल, जिरं, मोहरी आणि हिंग टाकायचं. यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण टाकायचं आणि वरतून त्याच्यावर थोडेसे तीळ टाकायचे. याला चांगलं भाजू द्यायचं. त्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील चांगलं भाजून घ्यायचं. दोन्ही बाजूने चांगलं भाजून घ्यायचं आणि हा आपला रवा हांडवो बनवून तयार होते. दही चटणीसोबत आपण याला खाऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
नाश्त्याला नेहमीचेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? मग बनवा रवा हांडवो, आवडीने खाल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement