हिवाळ्यात आरोग्यदायी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल रसरशीत आवळा मुरांबा! Recipe

Last Updated:

Amla murabba recipe: आवळ्याला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे कारण ही औषधी वनस्पती विविध पद्धतीनं शरीर सृदृढ ठेवण्यास फायदेशीर ठरते. आवळ्याचा रस तर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी रामबाण असतो कारण त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती जबरदस्त वाढते.

आवळा मुरांबा रेसिपी
आवळा मुरांबा रेसिपी
शुभेंद्र द्विवेदी, प्रतिनिधी
आजमगड : आंबट आवळा साखर मिसळून खाण्याच्या नुसत्या विचारानंच तोंडाला पाणी सुटतं. खरंतर आवळ्याला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे कारण ही औषधी वनस्पती विविध पद्धतीनं शरीर सृदृढ ठेवण्यास फायदेशीर ठरते. आवळ्याचा रस तर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी रामबाण असतो कारण त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती जबरदस्त वाढते. थंडीत आवळा खाणं विशेष फायदेशीर मानलं जातं. आपण याचा अतिशय स्वादिष्ट असा मुरांबा बनवूनही खाऊ शकता.
advertisement
साहित्य : साखर, वेलचीपूड, लवंग, इत्यादी.
कृती : सर्वात आधी आवळे स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर हव्या त्या आकारात कापावे किंवा फोकने त्यांना छेद करावे (जेणेकरून नंतर त्यांमध्ये पाक व्यवस्थित मुरेल). आता एका भांड्यात पाणी घ्यावं. त्यात कापलेले आवळे घालून साधारण 10 ते 15 मिनिटं हे पाणी उकळावं. आवळे नरम झाले की, चाळणीने गाळून त्यांना बाहेर काढावं.
advertisement
आता पाक बनवायला घ्यावा. त्यासाठी एका पातेल्यात साखर आणि 4-5 कपभर पाणी घालावं. हे मिश्रण तोपर्यंत गॅसवर ठेवून ढवळावं जोपर्यंत साखर पूर्णपणे पाण्यात विरघळत नाही. साखर पाण्यात एकजीव झाली की, उकडलेले आवळे साखरेच्या पाकात घालावे आणि हे मिश्रण बारीक गॅसवर आणखी शिजवून घ्यावं. अधूनमधून पाक ढवळावा. जवळपास 30 ते 40 मिनिटं हे मिश्रण शिजवून घ्यावं. पाक घट्ट व्हायला हवा.
advertisement
पूर्ण शिजल्यानंतर मुरंब्यात वरून चवीनुसार वेलचीपूड आणि लवंग घालावं. आपल्याकडे केशर असेल तर तेदेखील घालू शकता. केशरमुळे मुरांब्याला उत्तम रंग आणि सुगंध येईल. अशाप्रकारे आवळ्याचा स्वादिष्ट असा औषधी मुरंबा तयार आहे. घरातला प्रत्येक सदस्य हा मुरांबा अगदी मिटक्या मारत खाईल एवढा तो चविष्ट असतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
हिवाळ्यात आरोग्यदायी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल रसरशीत आवळा मुरांबा! Recipe
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement