पापलेटला तोडीस तोड, होऊन जाऊद्या, श्रावण नाही मोडणार! Veg fish fryची सोपी रेसिपी
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
तुम्हीसुद्धा श्रावणात मासे मिस करताय का? डोन्ट वरी...आज आपण एकदम भारी रेसिपी पाहणार आहोत. ज्यामुळे तुमचा श्रावण अजिबात मोडणार नाही आणि चिभेचे चोचलेही पुरवले जातील.
प्रियंका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : मासे म्हणजे मांसाहारप्रेमींचा जीव की प्राण. सुके, तळलेले, भाजलेले, कालवणातले अशा वेगवेगळ्या माश्यांवर आपण ताव मारतो. जर श्रावण पाळला असेल, तर मात्र इंटरनेटवर अचानक माश्यांचा फोटो समोर आला की तोंडाला चटकन् पाणी सुटतं. तुम्हीसुद्धा श्रावणात मासे मिस करताय का? डोन्ट वरी...आज आपण एकदम भारी रेसिपी पाहणार आहोत. ज्यामुळे तुमचा श्रावण अजिबात मोडणार नाही आणि चिभेचे चोचलेही पुरवले जातील.
advertisement
डाळभात, भाजी-चपाती, भाकरी, आमटी, लोणचं, पापड या जेवणाला तोड नाहीच. शिवाय इतर शाकाहारी पदार्थांनीही जीव अगदी तृप्त होतो. उपवासाला तर साबुदाणा खिचडीपासून मिसळपर्यंत कुकिंगचे वेगवेगळे प्रयोग आपण करतो. तरीसुद्धा तुम्हाला मासेच खावेसे वाटत असतील. तर स्मिता कापडणे यांनी चमचमीत अशी व्हेज फिश फ्रायची रेसिपी सांगितली आहे. अगदी झटपट होणारे हे शाकाहारी मासे आहेत.
advertisement
साहित्य : 2 ते 3 बटाटे, 2 टीस्पून धनेपूड, 2 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून तिखट मसाला, 1/2 टीस्पून काळीमिरी पावडर, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून मीठ, बारीक चिरलेली पालक भाजी आणि फ्राय करण्यासाठी तेल.
कृती : सर्वात आधी बटाटे उकडून घ्यावे. मग पालक भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. आता एका वाटीत सर्व मसाले घेऊन त्यात पालक आणि बटाट्याचं मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाला माशासारखा आकार देऊन सर्व बाजूंनी कट करावं. आता माशांच्या आकाराचे व्हेज फिश फ्राय एका पॅनमध्ये तेल तापवून शॅलो फ्राय करून घ्यावे. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित परतले की, आपले व्हेज फिश फ्राय सर्व्ह करण्यासाठी तयार असतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2024 11:03 AM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
पापलेटला तोडीस तोड, होऊन जाऊद्या, श्रावण नाही मोडणार! Veg fish fryची सोपी रेसिपी