पुरणपोळीचा कंटाळा आलाय? झटपट तयार करा सोजीची गोड पोळी, पाहा रेसिपी Video

Last Updated:

विदर्भात घरोघरी सांजाची पोळी किंवा सोजीची पोळी केली जाते. इथं पाहा सोपी रेसिपी

+
पुरणपोळीचा

पुरणपोळीचा कंटाळा आलाय? झटपट तयार करा सोजीची गोड पोळी, पाहा रेसिपी Video

वर्धा, 6 डिसेंबर: घरात अचानक पाहुणे आले आणि अशावेळी गोडधोडाचं काय करावं असा प्रश्न गृहिणींना पडतो. त्यात पुरणपोळी बनविण्यासाठी खूप वेळ लागतो. अशावेळी सांज्याची पोळी म्हणजेच सोजीची पोळी उत्तम पर्याय आहे. सोजीची ही गोड पोळी नेमकी कशी बनवावी? याची रेसिपी वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर यांनी सांगितली आहे.
सोजीच्या पोळीसाठी साहित्य
1 वाटी सोजी, 2 वाटी कणिक, 1 वाटी गूळ, सुंठ, मीठ, वेलचीपूड आणि तेल एवढ्याच साहित्यात आपण पोळी बनवू शकता.
सोजीच्या पोळीची कृती
सर्वप्रथम नेहमीच्या पोळीला लागते तशी कणिक मळून घ्यायची आहे. त्यानंतर गरम पाण्यामध्ये गूळ विरघळून घ्यायचा आहे. तोपर्यंत गव्हाची जाड दळून घेतलेली भरड म्हणजेच सोजी घ्यायची आहे. याच सोजीला काही ठिकाणी 'सांजा' असे म्हणतात. एका कढईमध्ये साजूक तूप घालून सोजी अगदी मंद आचेवर 2-3 मिनिटं परतून घ्यायची आहे.
advertisement
आता या सोजीमध्ये गुळाचं पाणी गाळून टाकायचं आहे. गुळात कच असू शकतो. त्यामुळे इथे पाणी गाळून घेतले आहे. त्यात सुंठ, वेलची पावडर आणि मीठ ऍड करायचं आहे. आता चांगलं परतून घेऊन हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर चुरून घ्यायचं. त्याचे छोटे गोळे बनवून घ्यायचेत. म्हणजे पोळी बनविण्यासाठी सोपे होईल.
advertisement
आता कणकेचा गोळा थोडासा लाटून घेऊन त्यात सोजीचा गोळा टाकून चांगलं बंद करायचं आहे. अगदी पुरणपोळीप्रमाणे ही पोळी लाटून घ्यायची आहे. तव्यावर दोन्ही साईडने तेलाने चांगली फ्राय करून घेतल्यानंतर गरमागरम सर्व्ह करायची आहे. ही पोळी गरमागरम खाल्ल्यास चांगली लागते. थंड झाल्यावर याची विशेष चव येत नाही. त्यामुळे तुम्ही देखील ही पोळी गरमागरम खावी, असं गृहिणी मकेश्वर सांगतात.
advertisement
दरम्यान, अगदी कमी साहित्यामध्ये घरगुती सोप्या पद्धतीने झटपट बनणारी सोजीची पोळी आपणही ट्राय करू शकता.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
पुरणपोळीचा कंटाळा आलाय? झटपट तयार करा सोजीची गोड पोळी, पाहा रेसिपी Video
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement