Hair Day & Cancer: तुमची फॅशन ठरेल जीवघेणी, हेअर डाय आणि स्ट्रेटनिंगमुळे कॅन्सरचा धोका, आत्ताच व्हा सावध
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Hair Day & Cancer Connection in Marathi: कलरिंग, स्ट्रेटनिंग किंवा वेगवेगळ्या हेअर ट्रिटमेंटमुळे काही महिलांच्या व्यक्तीमत्वात अमूलाग्र बदल दिसून आला जरी असला तरीही डायमध्ये असलेल्या केमिकल्समुळे महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू लागलाय.
मुंबई: आत्तापर्यंत पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी हेअरडाय किंवा मेहंदीचा वापर केला जात होता. मात्र गेल्या 3-4वर्षात पाश्चिमात्यांचं अनुकरण करण्यासाठी केसांना मुलायम करण्यासाठी केरटिनीन करणं. चंदेरी, सोनेरी, हिरव्या गुलाबी रंगानी रंगवणं किवा हायलाईट करण्याचे प्रकार वाढले आहेत. कलरिंग, स्ट्रेटनिंग किंवा वेगवेगळ्या हेअर ट्रिटमेंटमुळे काही महिलांच्या वक्तीमत्वात अमूलाग्र बदल दिसून आला असून त्यांच्या सौंदर्यातही वाढ झालीये.मात्र सुंदर दिसण्यासाठी केले जाणारे हे प्रयत्न, प्रयत्न नसून ते उपद्व्याप ठरू शकतात. कारण विविध प्रकारच्या डायमध्ये असलेल्या केमिकल्समुळे महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू लागलाय.
जाणून घेऊयात हेअर ट्रिटमेंट आणि कॅन्सरचा नेमका काय आणि कसा संबंध आहे तो ?
डॉ. सज्जन राजपुरोहित, वरिष्ठ कॅन्सरतज्ज्ञ म्हणतात की, हेअर डाय आणि हेअर स्ट्रेटनरमध्ये फॉर्मल्डिहाइड, पॅराबेन्स आणि इतर अनेक हानिकारक रसायनं असतात. यातली काही रसायनं ही आरोग्यासाठी धोकादायक असतात. कारण हे कार्सिनोजेन शरीरात गेल्यामुळे हार्मोन्सच्या स्रवण्यावर परिणाम करू शकतात. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्यासाठी इस्ट्रोजेन हार्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढून महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाला आमंत्रण मिळू शकतं.
advertisement
गहुवर्णीय सावळ्या महिलांना अधिक धोका
2019 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासात असं दिसून आले आहे की ज्या स्त्रिया सावळ्या किंवा गहुवर्णीय आहेत आणि त्या नियमितपणे केसांना डाय लावतात किंवा स्ट्रेटनिंग करतात अशा महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. कारण सावळ्या किंवा गडद रंगाच्या महिलांच्या केसांची रचना वेगळी अस. त्यामुळे त्यांच्या केसांना अतिरिक्त डाय लावाला लागतो. मात्र असं नाहीये की, हेअर डाय किंवा स्ट्रेटनिंग करण्याऱ्या सगळ्याच महिलांना ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनांच्या कर्करोगाचा सामना करावा लागतो. कारण ब्रेस्ट कॅन्सरसाठी एक-दोनच नाही तर अनेक कारणं जबाबदार आहेत. निरोगी जीवनशैली, आहार, अनुवंशिकता,प्रदूषणाचा आरोग्यावर होणारा परिणाम अशी कारणंही स्तनांच्या कर्करोगाला प्रामुख्याने जबाबदार आहेत. पण त्याशिवाय हेअर डाय किंवा स्ट्रेटनिंग केमिकल्सचा अतिवापरसुद्धा कॅन्सरचं कारण ठरू शकतं.
advertisement
ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कसा कमी करायचा ?
जर तुम्हाला केसांना डाय करायचा असेल तर नैसर्गिक उत्पादने किंवा हर्बल उत्पादनांचा वापर करा. सतत स्ट्रेटनिंग किंवा जाय करणं टाळा.याशिवाय केसांना कायमस्वरूपी एकदा विशिष्ट रंग किंवा त्यांची ठेवण बदलण्याचा प्रयत्न करू नका.ज्या उत्पादनांमध्ये घातक रसायनं असतील अशी उत्पादनं वापरणं टाळा. कोणत्याही प्रकारचा कर्करोग टाळण्यासाठी संतुलित आहार घ्या. दररोज हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं, सुका मेवा असा पौष्टिक आहार घ्या. तुमचा कॅन्सरचा घोका कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली ही अत्यंत्य आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 07, 2025 7:20 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Day & Cancer: तुमची फॅशन ठरेल जीवघेणी, हेअर डाय आणि स्ट्रेटनिंगमुळे कॅन्सरचा धोका, आत्ताच व्हा सावध