Health Tips : पायाच्या तळव्यांवर लसूण चोळण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का? प्रियांका चोप्रा सुद्धा करते हा उपाय

Last Updated:

पायाच्या तळव्यांवर लसूण चोळल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात.

पायावर लसूण चोळण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का? प्रियांका चोप्रा सुद्धा करते हा उपाय
पायावर लसूण चोळण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का? प्रियांका चोप्रा सुद्धा करते हा उपाय
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या ऑस्ट्रेलियामध्ये तिच्या ‘द ब्लफ’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. या दरम्यान प्रियांकाला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी उपचार करताना प्रियांका तिच्या पायाच्या तळव्यांवर लसणाच्या पाकळ्या चोळताना दिसली. अनेक लोक ती करत असलेला हा उपाय पाहून हैराण झाले. तेव्हा पायाच्या तळव्यांवर लसूण चोळल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात.
पायाच्या तळव्यांवर लसणाच्या पाकळ्या चोळणे हा उपाय विज्ञानावर आधारित आहे. टिस्सर आणि इंस्टीट्यूटच्या एका रिपोर्टनुसार, या प्रक्रियेमुळे तुम्हाला अनेक लाभ मिळतात. जेव्हा लसणाची पाकळी कापली जाते किंवा तिला ठेचलं जातं तेव्हा ही क्रिया एलीनला एलीनेज नावाच्या एंजाइमच्या संपर्कात आणते. या संपर्कामुळे एलिसिन बनते. त्यामुळे जेव्हा लसूण पायावर चोळले जाते तेव्हा एलिसिन त्वचेत प्रवेश करून मग रक्तात प्रवेश करते. एलिसिन हा विविध प्रकारच्या कॅन्सरला रोखण्यासाठी, लो शुगर, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर आणि वर्कआउटनंतर मांसपेशीला रिकव्हर करण्यास मदत होते आणि संक्रमणापासून वाचवण्यास मदत मिळते.
advertisement
सांधेदुखी आणि मांसपेशीमध्ये होणाऱ्या वेदना रोखण्यासाठी पायाच्या तळव्यांवर लसूण चोळणे हा एक चांगला उपाय आहे. लहसुनच्या पेस्टला तुमच्या दिनचर्येत सामील करू शकता मात्र त्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. लसणात दाहक विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे वेदना कमी करण्यास मदत होते. तेव्हा जर तुम्ही फार थकला असाल किंवा मग तुमचे पाय खूप दुखत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पाहू शकता. जे लोक प्रवासात खूप वेळ उभे राहतात अशांसाठी हा घरगुती उपाय अतिशय उपयुक्त ठरू शकतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : पायाच्या तळव्यांवर लसूण चोळण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का? प्रियांका चोप्रा सुद्धा करते हा उपाय
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement