Hair car tips : शेपटीसारखी वेणी जाडसर होईल; लांब आणि दाट केसांसाठी घरीच बनवा हे तेल

Last Updated:

तुम्हालाही केस पातळ असणे व गळणे या समस्या असतील तर केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आजीने सांगितलेला हा उपाय ट्राय करू शकता.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : अनेकांची तक्रार असते की केस खूप गळतात. केस खूप गळल्यामुळे ते पातळ होतात. त्यामुळे केस दाट व्हावे यासाठी ते विविध प्रयोग करतात. अगदी घरगुती उपाय करण्यापासून ते हेअर एक्सपर्ट्सकडे जाण्यापर्यंत अनेक प्रयोग केले जातात. लांब आणि दाट केसांसाठी काही जण अनेक उपचार घेतात, पण यात वापरल्या जाणाऱ्या केमिकलमुळे केसांना पोषण मिळण्याऐवजी त्यांचे सौंदर्य कमी होते.
तुम्हालाही केस पातळ असणे व गळणे या समस्या असतील तर केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आजीने सांगितलेला हा उपाय ट्राय करू शकता. आम्ही तुम्हाला एका घरगुती तेलाबद्दल सांगणार आहोत. हे तेल कसं बनवायचं व या तेलाचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
केस लांब करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करावा?
- मोहरीचं तेल
advertisement
- कांद्याचा रस
केसांना मोहरीचं तेल लावल्याने काय होतं?
- मोहरीचं तेल केसांसाठी नॅचरल कंडिशनरचं काम करतं.
- केसांचं पोषण करण्यापासून ते त्यातला कोरडेपणा कमी करण्यासही ते फायद्याचं ठरते.
- हे नवीन केस येण्यास आणि योग्य पोषण प्रदान करण्यास मदत करतं.
कांद्याचा रस केसांना लावल्यास काय फायदा होतो?
- कांद्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं, जे केस चमकदार आणि दाट होण्यास मदत करतं.
advertisement
- कांद्यात सल्फर असल्यामुळे ते केस पातळ होण्यापासून रोखतं.
- कांद्यामध्ये असलेली अँटिऑक्सिडंट तत्त्व केसात ओलावा प्रदान करण्यास मदत करतात.
केस लांब करण्यासाठी काय करावं?
- सर्वात आधी एका बाउलमध्ये केसांच्या लांबीनुसार लावायला आवश्यक वाटेल तितकं मोहरीचं तेल घ्या.
- एक कांदा बारीक करून त्याचा रस काढा आणि एका वाटीत ठेवा.
advertisement
- हे दोन्ही चांगले मिसळा आणि हाताच्या बोटांच्या मदतीने टाळूपासून संपूर्ण केसांना लावा.
- हे तेल तुम्ही तुमच्या केसांवर रात्रभर ठेवू शकता किंवा केस धुण्याच्य दोन-तीन तास आधी लावू शकता.
- शॅम्पू आणि कंडिशनरच्या मदतीने केस धुवून घ्या.
- तुम्ही आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.
- याचा सतत वापर केल्याने तुमचे केस काही काळाने गुडघ्यांपर्यंत लांब होऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair car tips : शेपटीसारखी वेणी जाडसर होईल; लांब आणि दाट केसांसाठी घरीच बनवा हे तेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement